सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (११ सप्टें.) : सध्या पावसाळा सुरु आणि राज्यासह शहरी ग्रामीण नदी नाले, डॅम, धरण तुडुंब भरून वाहत असल्याचे चित्र आहे. अधिक चा जलसाठा होत असल्याने राज्यातील धरणाचे पाणी सोडले जात आहे. तसे मारेगाव प्रशासन नदी लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देत आहे. अशातच यवतमाळ जिल्हा मारेगाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले वर्धा नदी च्या कोसारा पुलावरून पाणी गेल्या दोन दिवसापासून वाहत असल्याने पूल ओलांडू नये असे प्रशासना कडून सांगण्यात येत आहे. दरम्यान,माढेळी वरोरा मार्ग जाणारी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.
यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर मारेगाव तालुक्यातील कोसारा हे गाव वसलेले आहे. कोसारा वरून माढेळी,वरोरा मार्ग चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात जाण्याकरिता वाहतूक सेवा नियमित चालू असते. कोसारा गावापासून काही अंतरावर वर्धा नदीवर पुलाची निर्मिती करण्यात आली. मात्र, सर्वत्र कोसळधार पाऊस पडत असलेल्या पावसाने नदी नाल्याना पूराची स्थिती निर्माण झाली असे चित्र आहे.
दरम्यान,बेबंडा चे पाणी सोडल्याने यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या कोसारा येथील पुलावरून पाणी दु-थळी भर वाहतेय. त्यामुळे वाहतूक सेवा काही काळ ठप्प झाली होती. दोन वर्षा पूर्वी कोसारा पुलावरून असेच पाणी वाहत असतांना एका ऑटो चालकांने वाहत्या पुलावरून वाहन टाकले असता यात ऑटोतील प्रवासी पाण्यात वाहून गेले होते व यात दोन इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना वाहन चालकांनी पूल ओलांडू नये असा ईशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
"प्रशासन आवाहन करून मोकळे झाले असून, महसूल विभाग व पोलीस विभागाचे कोणतेही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही. त्यामुळे काही हानी झाल्यास जबाबदार कोण?असा प्रश्न कोसरा येथील स्वराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचीन पचारे यांनी केला आहे."
कोसारा पूल पाण्याखाली, प्रशासनाचा सावधगिरीचा इशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 11, 2021
Rating:
