सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (११ सप्टें.) : तालुक्यातील राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात सोई सुविधांचा अभाव असून एकच डॉक्टर या प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असल्याने रुग्णांची चांगलीच गरसोय होतांना दिसत आहे. या आरोग्य केंद्राकरिता निवासी परिचारिकाही नसल्याने रात्री या दवाखान्यात पूर्णतः शुकशुकाट असतो. रात्रीला अत्यावश्यक उपचारही याठिकाणी मिळत नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. चपराशी सुद्धा नुकताच कंत्राटी पद्धतीवर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. सर्वात मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेले राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी असल्याने रुग्णांची किती दक्षता घेतली जात असेल याची प्रचिती येते. विविध गावातून आरोग्य सेविका बोलावून उपचार करावे लागत आहे. रात्र पाळीत डॉक्टरच राहत नसल्याने रुग्णांना सरळ वणीला आणावे लागते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाही उपलब्ध नसून जुनी रुग्णवाहिका आरोग्य विभागाने इतरत्र हलविली आहे, तर नवीन रुग्णवाहिकेचे मागील दिड महिन्यांपासून लोकार्पणच झाले नसल्याने राजूर येथील रुग्णांच्या चांगल्याच हालपेष्ठा होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे रोगराईच्या या काळातही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये योग्य व अत्यावश्यक उपचार रुग्णांना मिळत नसल्याने रुग्णसेवेचा बोजावरा झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राची फारच दुरावस्था झाली आहे. याठिकाणी एकच डॉक्टर कार्यरत असून रात्र पाळीत रुग्णालयात डॉक्टरच उपलब्ध राहत नसल्याने अत्यावश्यक उपचाकरीता रुग्णांना थेट वणीला आणावे लागते. या प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकाही उपलब्ध नसून नविन आलेल्या रुग्णवाहिकेचे मागील दिड महिन्यांपासून लोकार्पणच करण्यात आलेले नाही. जुनी रुग्णवाहिका आरोग्य विभागाने इतरत्र हलविली असून ती दिसेनासी झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात निवासी परिचारिकेची नियुक्तीच नसून एकाच डॉक्टर व कंत्राटी चपराशावर या आरोग्य केंद्राचा डोलारा आहे. संसर्गजन्य आजारांनी मागील काही दिवसांत थैमान घातले आहे. डेंग्यू मलेरिया व टायफाईडचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहे. ताप, सर्दी, खोकल्याची साथ सुरु आहे. अशा या विपरीत परिस्थितीत डॉक्टर, नर्सेसची कमतरता व सोइ सुविधांचा अभाव म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. रात्री अपरात्री अपघात किंवा अन्य कोणताही आजार झाल्यास आरोग्य केंद्रात कुणी हजरच रहात नसल्याने त्यांच्या उपचाराचे काय, हा प्रश्न अनेक दिवसांपासून अनुत्तरित आहे. प्रशासनाचे या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळत आहे. राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व परिचारिकांची नियुक्ती करून रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याची मागणी राजूरवासियांकडून करण्यात येत आहे.
राजूर प्राथमिक आरोग्य केंद्रच झाले आहे आजारी, रात्र पाळीत डॉक्टर व निवासी परिचारिकाच नाही
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 11, 2021
Rating:
