अभिष्टचिंतन! आज मायाताई यांचा जन्मदिन, संघर्षावर मात करणाऱ्या मायाताई

सह्याद्री काव्यरंग | 
शब्द पाळता येत नसेल तर काेणाला शब्द द्यायचा नाही या तत्वाशी एकरुप असणां-या मायाताई काेसरे यांचा जन्म चंद्रपूर जिल्ह्यात झाला. मायाताईंचे पिताश्री हे एक जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक हाेते. जिल्ह्याचे ते असल्यामुळे व  डॉक्टरी व्यवसायात प्रविण्यपूर्ण असल्या कारणाने नागरिकांशी त्यांची नाळ चांगलीच जुळली हाेती. एका स्वातंत्र्य सैनिकाची मायाताई ही कन्या असल्यामुळे हळहळु त्यांचाही परिचय समाजात झाला. परंतु मायाताईंचे लग्न झाल्यानंतर अधिक काळ त्या सुखी जिवनाचा आनंद उपभाेगू शकल्या नाही हे दुख: सहजच त्यांचे मनाशी सलते आहे. याच परिस्थितीवर मात करतांना त्यांना साेनू व माेनूचा सांभाळ करावा लागला. त्यातच जानाळा येथील शेतीची जबाबदारी त्यांचे खांद्यावर आली. कठीण संघर्षाचा सामना करीत मायाताईने आपल्या दाेन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले. त्या पैकी साेनु (मायाताईची माेठी कन्या) तरं माेनु (छाेटी कन्या पुनम) साेनु ही विवाहानंतर आज सुखी संसारात रमली आहे. एव्हढचं नाही तर उपराजधानीत ती जॉब सुध्दा करतेय आहे. छाेटी कन्या माेनु इंजीनियर झाली आहे. सध्या तिची स्पर्धा परीक्षेची तयारी जाेरात सुरु आहे. घर संसार सांभाळुन मायाताई याेगाचे क्लास नागपूरात घेते आहे. पतंजलीशी त्यांचे आजपावेताे तेव्हढेच मधुर व गाेड संबंध राहिलेले आहे. टीकाकारांच्या टीके कडे दुर्लक्ष करणे हेच ध्येय मनाशी जपुन त्यांनी आज ख-या अर्थाने यशाची पायरी गाठली आहे. महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाची गत पांच वर्षापुर्वि निर्मिती झाली. तेव्हा मायाताईंच नांव पहिल्यांदा एक महिला कास्तकार म्हणुन सहजं सुचलंशी जुळल्या गेले. नंतर वैदर्भिय साहित्य क्षेत्रातील मेघाताईं धाेटे यांना या व्यासपीठात सामावून घेण्यांत आलं ! आजच्या घडीला संहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका म्हणून आपली जबाबदारी त्या (दाेघींही) तेव्हढ्याच जबाबदारीने नित्यनेमाने पाळते आहे. सहजं सुचलं विस्तार फार भव्य दिव्य स्वरुपात असुन, या क्षणाला महाराष्ट्राच्या कानाेकाेप-यातील एक हजार पेक्षा अधिक महिला सहजंच्या सदस्या आहे. हे थाेडे थाेडके नव्हे ! व्यासपीठावरील महिलांच्या कलागुणांना वाव देणे हाच एकमेव उद्देश्य या ग्रुपचा आहे. मायाताईंचं या व्यासपीठा साठी अनमाेल योगदान आहे. हे विसरता येण्यांसारखे नाही.आम्हा सर्वासाठी त्या प्रेरणादायी आहे हे सहजरित्या व प्रांजळपणे आम्हाला कबूल करावेच लागेल. वर्धा जिल्ह्यातील रितू सारख्या एका महाविद्यालयीन तरुणीने या व्यासपीठाची मुहुर्तमेढ राेवली हे आजही मायाताईंच्या चांगलेच स्मरणात आहे.  व्यासपीठावरील सर्व महिला सदस्यांना घेवून चालणां-या मायाताईंच्या नावांतच !!माया!! साठवली आहे. त्यामुळे सदासर्वदा हे व्यासपीठ असेच सुरु राहील याची आम्हास आशाच नाही तर पुर्णता खात्री आहे. अश्या कर्तूत्वान मायाताईंचा आज शनिवार दि ११ सप्टेंबरला वाढदिवस आहे. त्यांना सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या वतीने अनंत शुभेच्छा.. ! शेवटी मी हेच म्हणील की, मायाताई तुम जियाे हजाराें साल ........... .! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभोत.


~ लेखिका : सुविद्या बांबाेडे
अभिष्टचिंतन! आज मायाताई यांचा जन्मदिन, संघर्षावर मात करणाऱ्या मायाताई अभिष्टचिंतन! आज मायाताई यांचा जन्मदिन, संघर्षावर मात करणाऱ्या मायाताई Reviewed by सह्याद्री चौफेर on September 11, 2021 Rating: 5
Powered by Blogger.