"लेक"
देवघरातील लक्ष्मी तू
घरात तेवनारी पणती तू
त्या पणतीचा प्रकाशही तू
आमच्या अंगणातील तुळस तू ll
आमच्या झाडाचे नाजूक फुल तू
आमची रम्य पहाट तू
सोनेरी क्षणाची आठवण तू
प्रेमाच्या पाझराची वाहती ऐक सरिता तू ll
वडिलांचा मान तू
आईचा सन्मान तू
बहिण भावाचा आधार तू
भाग्य आमचे थोर आमची लेक आहेस तू ll
सौ. सरोज वि. हिवरे
काव्यकुंज संयोजिका
सहकार नगर रामपूर राजुरा
जिल्हा चंद्रपूर
सह्याद्री काव्यरंग : लेक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
