मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत नरसाळा येथे आरोग्य तपासणी शिबिर


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (२६ सप्टें.) : तालुक्यातील नरसाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत उपकेंद्र नरसाळा येथे (२५ सप्टें.) ला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
  
मानव विकास कार्यक्रम महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत विविध योजना व उपक्रम राबविल्या जातात. स्त्रीरोग तज्ञ यांचे कडून गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी करणे तसेच ० ते ६ महिने वयोगटातील बालकांची व स्तनदा मतांची तपासणी करणे व औषधोपचार करणे तसेच ६ महिने ते २ वर्ष वयोगटातील बालकांची बालरोग तज्ञ यांच्या कडून तपासणी करणे, अ. जा./अ. ज./दरिद्र रेषेखालील गरोदर महिलेला बुडीत मजुरी पोटी रू.८००/ गरोदर पणातील नवव्या महिन्यात दिले जातात. ही माहिती ग्रामीण भागातील सर्वसामान्य महिलापर्यंत शिबिराच्या माध्यमातून दिली जातात.
     
आज शनिवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी मानव विकास कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत नरसाळा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष येथील सरपंच श्री. संगीत मरस्कोले, प्रमुख पाहुणे श्री. यादवराव पांडे उपसरपंच, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ.अर्चना देठे तालुका वैद्यकीय अधिकारी तालुका मारेगाव, मा. डॉ. सतीष कोडापे वै. अ. वेगाव, मा. डॉ. जुनगरी भरारी पथक म्हैसदोडका, मा. डॉ. आवारी स्त्रीरोगतज्ञ, मा. डॉ. दूमने बलरोग तज्ञ व येथील उपसरपंच यादवराव पांडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या शिबिरात ३८ गरोदर मातेची तपासणी करण्यात आली. २२ स्तनदा व ० ते ५ महिने वयोगटातील ३१ बालकांची सुद्धा तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये (ANC.HB.BP) शुगर व इतर तपासण्या करण्यात आल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आरोग्य सेवक डी. टी. लांबट, सुधा साखरकर BON ता. अ. कार्यालय मारेगाव, के. डब्ल्यू. उमरे आ. सा., चंद्रशेखर कुमरे लसीकरण क्षेत्र निरीक्षक, एन. डी. देऊळकर, आ.सा. सुधाकर कोल्लुरी, MPW श्रीमती शिला कनाके, एल.सी. वेट्टी, वाय. टी. पेंदोर (ANM), जया भुसारी (आशा वर्कर), मीना राऊत (आशा), नरसाळा, भारती खाडे (अंगणवाडी सेविका), सविता गोवर्धन (अंगणवाडी सेविका), साधना रायपूरे (अंगणवाडी सेविका) नरसाळा, उर्मिला वराटे (आशा) घोडदरा, मंगला ताकसांडे (आशा) बुरांडा (ख.), उमा परचाके (आशा) धामणी, गीता कुळमेथे (मदतनीस), अर्चना कोवे (आशा) मारेगाव, या वरील सर्वानी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डी. टी. लांबट आरोग्य सहायक यांनी केले. तर आभार प्रदर्शन के. डब्ल्यू. उमरे आ. सा. प्रा. केंद्र वेगाव यांनी केले. या शिबिराला बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या.
मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत नरसाळा येथे आरोग्य तपासणी शिबिर मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत नरसाळा येथे आरोग्य तपासणी शिबिर Reviewed by सह्याद्री चौफेर on September 26, 2021 Rating: 5
Powered by Blogger.