सह्याद्री न्यूज | शिला जी धोटे
कोरपना, (२६ सप्टें.) : केंद्र शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ भारत बंदसह अनेक महिन्यापासून शेतकरी निदर्शने आंदोलन दिल्ली दरबारात करत असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र डोळे बंद करीत प्रश्न मार्गी लावण्यात सरकार अपयशी ठरला आहे.
उद्याला संपूर्ण देशामध्ये "भारत बंद" पुकारल्याने शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरावर बंदला पाठिंबा दिला असून, कोरपना येथे निदर्शने व शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद जोगी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सोहेल अली, राष्ट्रवादी किसान आघाडीचे अध्यक्ष विनोद जुमडे, महिला राष्ट्रवादी आघाडीचे अध्यक्ष रितिका ढवस, कार्याध्यक्ष ज्योत्स्ना कोडापे, अल्पसंख्यांक राष्ट्रवादी आघाडीचे अध्यक्ष महबूब अली राष्ट्रवादी, ओबीसी आघाडीचे वासुदेव बल्की, सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष धनराज जीवने, आदिवासी आघाडीचे विकास टेकाम, भटक्या-विमुक्त आघाडीचे प्रवीण जाधव यांनी भारत बंदला पाठिंबा दर्शवून बंदचे आवाहन केले आहे.
उद्य्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोरपना बंद चे आवाहन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
