सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२६ सप्टें.) : आज ग्रामपंच्यायत कार्यालय कासारबेहळ (सेवानगर) येथे सौ.जयश्रीताई राठोड (सरपंच संघटना उपअध्यक्ष महागाव) तर्फे व ग्रामपंच्यायंत कासारबेहळ यांच्या तर्फे सुवर्णपदक पटकावणाऱ्या सेवानगर येथील राजकुमार भिकु जाधव यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या क्रार्याक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. जयश्रीताई राठोड हे होते. त्यानी हरियाणा येथे आयोजित स्टुडन्ट ऑलिंपिक असोसिएशनच्या वतीने हरियाणा येथे आयोजित २२ वर्षीय वयोगटांमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महागाव तालुक्यातील सेवानगर कासारबेळ येथील राजकुमार जाधव यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी जयश्री ताई यांनी 'आपल्यामध्ये असलेल कौशल्य' गुण समाजासमोर मांडा नक्कीच असे हजारो राजकुमार तयार होतील. असे नवयुवक तरुणाचे मनोबल वाढवणारे मनोगत व्यक्त केले. व राजकुमारला पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल राठोड, रावतेभाऊ, उपसरपंच विष्णु जाधव, सचिव दोडके, मोहणराव कर्हे, कांताबाई पाटे, दशरथ राठोड ,अशोक पाटील, दिपकराव कर्हे, नंदकुमार मस्के, मधुकर राठोड, आनील पवार, राहुल राठोड ,पवन ठाकरे, दिलीप पीटलेवाड, इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आजेश भाऊ जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर पवार यांनी केले.
ग्रामपंचायत कासारबेहळ येथे सुवर्णपदक विजेता राजकुमार जाधव यांचा सत्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
