सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२६सप्टें.) : महाविकास अघाडी कडून घेण्यात येणांऱ्या आरोग्य भर्ती ग्रूप 'क' आणि ग्रुप 'ड' परीक्षा पूर्व सूचना न देता परिक्षेच्या १० तास आधी रदद् करून पुढे ढकलण्यामुळे चंद्रपूरात आपकडुन काल सायंकाळी निषेध नाेंदविण्यात आला.
आधीच खुप उशिरा काढण्यात आलेली ही आरोग्य भर्ती असून त्यात विद्यार्थ्यांना हॉल तिकिट चार दिवसाआधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यात कोणाला नोयडा उत्तरप्रदेश तर कोणाला चीनला सेंटर देण्यात आले. विद्यार्थ्याच्या नावा ऐवजी त्याचे वडिलांचे नाव व वडिलांच्या नावाच्या ऐवजी त्याचे नाव ! सेंटर नाव आहे पण जिल्हा नाही असे एक नाही तर अनेक भोंगळ कारभार या आरोग्य विभागाने समोर आणून ठेवल्या मुळे परीक्षा पुढे ढकली आहे. यांची यंत्रणा योग्य नाही. बेजबाबदारपणे काम केले आहे हे एकंदरीत या सर्व प्रकारावरुन दिसून आले आहे.
अनेकांना बाहेर गावचे सेंटर मिळाले. विद्यार्थी परिक्षेच्या आदल्या रात्रि पोहचले. काही प्रवासात असताना त्यांना ही बाब कळली की परीक्षा पुढे ढकली! विद्यार्थ्यांना झालेल्या व होणांऱ्या आर्थिक व मानसिक नुकसानीस जबाबदार काेण ? असा सवाल राजेश चेडगुलवार यांनी उपस्थित केला आहे. आम आदमी पार्टी युवा अघाड़ीच्या काही मागण्या असून त्या या प्रमाणे आहे तदवतचं महाविकास सरकारने परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तात्काळ याेग्य न्याय द्यावा अशी मागणी देखिल त्यांनी या वेळी केली आहे.
आम आदमी पार्टी ने केलेल्या प्रमुख मागण्या :
१) आरोग्य भर्ती परीक्षा देणाऱ्यांचा ८ लाख विद्यार्थी यांचा छळ थांबवावा.
२) आरोग्य विभाग परिक्षेला बाहेर गावा वरुन आलेल्या विद्यार्थ्यांचा खर्च परत करण्यात यावा .
३) पुढील परीक्षा १५ दिवसाच्या आत योग्य नियोजन करून घेण्यात यावी.
४) पुढल्या परिक्षेला जाण्या येण्यांचा खर्च शासनाने उचलावा
५) आरोग्य विभागाने आपला भोंगळ कारभार तातडीने थांबवत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
या भाेंगळ कारभारचा आपने निषेध नाेंदविला असुन उपराेक्त निषेध नाेंदविते वेळी आपचे सुनील देवराव मुसळे जिल्हाध्यक्ष, मयूर राइकवार युवा जिल्हाध्यक्ष, सूनिल भोयर , भिवराज सोनी संतोष दोरखंडे योगेश आपटे राजू कुडे सचिव, सन्दीप तुरकयाल, अजय डुकरे एँडवोकेट प्रतीक वीरानी, योगेश भलावी , सिकन्दर सागोरे उपाध्यक्ष, चंदू माडुरवार, अशरफ भाई सैयद, राष्ट्रपाल बूटले, रोशन शेख, जेष्ठ कार्यकर्ता वामनराव नंदूरकर, अमोल बलकी, दिलीप तेलंग, सुजित चेडगुलवार, आदीं पदाधिकारी उपस्थित होते.
आम आदमी पार्टी युवा आघाडीने केला चंद्रपूरात महाविनाश आघाडी चा निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
