सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२६ सप्टें.) : संयुक्त किसान मोर्चाने आपल्या राष्ट्रीय संमेलनात, मोदी सरकारच्या जनविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या व भारतीय संविधानिक मूल्यांशी विसंगत असलेल्या धोरणांविरुद्ध उद्या दि. २७ सप्टेंबरला महागावात 'भारत बंद' ची हाक दिली आहे. या भारत बंद च्या आंदोलनात सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चात सहभागी असलेल्या राजकीय,सामाजिक संघटनांनी केले आहे.
देश भर डाव्या पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला महागाव तालुका किसान सभा, मा,क,पा,च्या वतीने पाठिंबा देण्यासाठी उद्या दिनांक २७ /९ /२०२१ रोज सोमवार वेळ ११:३० वा. बाजार समिती महागाव येथे हजर रहावे, येथुन १२ वा. मुख्य मागणी चे निवेदन घेऊन शिस्तबद्ध रितीने तहसीलला जायचे आहे. केंद्र शासनाच्या जन, विरोधी धोरणामुळे आज शेतकरी, कामगार, नवयुवक, विद्यार्थी, व्यापारी, कष्टकरी वर्गासह गोरगरीब जनता चहूबाजूंनी मरण यातना भोगत आहे, वरुन महागाईचे चटके, खासगीकरणाचे तोटे, आणि नवनवीन शेतकरी व कामगार विरोधी जुलमी कायदे करून मुलभूत अधिकार च काढून घेत आहे यासाठी प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.
१) कृषिचे तिन काळे कायदे रद्द करा , एम,एस,पी, कायदा करा.
२) कामगाराचे चार संहिता रद्द करा
३) नविन विज विधेयक रद्द करा
४) सोयाबीन सह ईतर माल आयातीच्या धोरणात बदल करा.
५) स्वामीनाथन समीती लागू करुन दीडपट भाव द्या
६) पिक विमा खासगी कंपनी रद्द करून सरकारी करा व मागील विमा मंजूर करा.
७) खासगी करणाचे धोरण रद्द करून महागाई कमी करा.
याकरिता गेल्या १० महिन्यापासून दिल्ली येथे शेतकऱ्यांना च्या विविध ५०० संघटना मिळुन "करो अथवा मरो" या क्रांतीकारी निर्धाराने स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई लढत असताना ६०० च्या वर शेतकऱ्यांनी प्राणाची आहुती दिली आहे, मग आपण केवळ एक दिवस दिलेल्या वेळेवर येवून जोरदार पाठिंबा द्यावे. असे
ॲड, डी.बी. नाईक मा. सभापती, पंचायत समिती महागाव यांनी आवाहन केले आहे.
देशभरातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, शेतमजूर, महिला, युवा, विद्यार्थी व इतर संघटनांनी या 'भारत बंद' ला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हा 'भारत बंद' प्रचंड प्रमाणात यशस्वी करण्यासाठी भाजपच्या विरोधात असलेले सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना,शेतकरी, शेतमजूर, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, महिला, युवा, विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक इत्यादी घटकांच्या संघटना तसेच विविध क्षेत्रांतील जनतेनी २७ सप्टेंबर ला महागावात होणाऱ्या भारत बंद आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संयुक्त किसान मोर्चा मध्ये सहभागी असलेल्या राजकीय , सामाजिक संघटना आदींनी केले आहे.
उद्या २७ सप्टेंबर ला महागावात "भारत बंद" ची हाक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
