सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (२६ सप्टें.) : मुदखेड शहरामध्ये दिनांक २४ सप्टेंबर रोजी रणछोडदास मंगल कार्यालय मुदखेड येथे आर्य वैश्य समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती महासभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मा. श्री नंदकुमार गादेवार, महासचिव श्री गोविंद बिडवई, कोषाध्यक्ष जीवन गौरव पुरस्कार सुभाषजी कन्नावार, प्रसिद्धी प्रमुख प्रदीपजी कोकडवार, वासवी मंदिर समिती अध्यक्ष अनिलजी मनाठकर, मुख्य समन्वयक नंदकुमार मडगुलवार मुखेडकर, समन्वयक सदानंद मेडेवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आर्य वैश्य महासभेच्या कार्यकारिणी सर्वानुमते जिल्हा कार्यकारणीवर गिरीश कोत्तावार व प्रवीण काचावर यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी नंदकुमार गादेवार यांनी पुढे बोलताना सांगितले की, ही संघटना जातीय संघटना नसून ही एक सेवाभावी संस्था आहे. यामुळे तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय ही महासभा चालली पाहिजे. ही महासभा चाळीसव्या वर्षात पदार्पण करीत आहे. महासभेच्या माध्यमातून मुदखेड च्या कोणत्याही अडचणी असूद्या ती अडचण आर्य वैश्य महासभेकडून सोडवणार, यामुळे समाज संघटक करण्याची काळाची गरज आहे. आयएसआय इंजिनीरिंगसाठी कुठल्याही प्रवेशासाठी, कोणत्याही खर्च असो तो खर्च पूर्ण फायनल होईपर्यंत महाराष्ट्र वैश्य महासभा पुर्ण करणार फक्त विद्यार्थ्यांनी मनलावुन अभ्यास करावा असे प्रतिपादन नंदकुमार गादेवार यांनी याप्रसंगी केले. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी नारायण कोत्तावार, राजाआप्पा कोत्तावार, नंदकुमार मामीडवार, गिरीश आप्पा काचावार, खंडू आप्पा चिद्रावार, पद्माकर मोटरवार, गजानन बंडेवार, दत्तात्रेय लाभसेटवार, राघवेंद्र पवीतवार, अनिल वट्टमवार, दीपक चक्रवार, प्रभाकर कोडगिरे माळकौठेकर, नितीन रायपवार, संतोष मामीडवार, मनीष रायपतरेवार, मनोज मामीडवार, यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय काचावार यांनी केले तर आभार नंदकुमार मामीडवार यांनी मानले.
मुदखेड येथे आर्य वैश्य समाजाचा मेळावा मोठया उत्सहात संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
