टॉप बातम्या

पांढरकवडा येथे भारतीय सैन्य व पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (२६ सप्टें.) : यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज यवतमाळ द्वारा संचलित, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय. पांढरकवडा येथे भारतीय सैन्य आणि पोलीस भरती मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २५/०८/२०२१ शनिवार रोजी करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सतीश भेदोडकर सर उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री सेवानिवृत्त माजी सैनिक जक्कावार साहेब हे उपस्थिती होती. याप्रसंगी श्री विकास गोरे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात कोणकोणत्या संधी असतात या संदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पोलिस भरतीमध्ये सुद्धा आपण सहजपणे लागू शकतो हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिंगत केला. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्षपणे मैदानावर प्रशिक्षणासाठी आम्ही येऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग अकरावी कला शाखेतील विद्यार्थिनी कुमारी स्नेहा संजय गौरकार हिने केले. प्रमुख पाहुणे म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ किशोर अग्गुवार हे सुद्धा उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि कोरोनाच्या नियमाचे पालन करून बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
Previous Post Next Post