टॉप बातम्या

सुंदर माझे कार्यालय अभियान

सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (२६ सप्टें.) : पांढरकवडा श्रमदान व साफसफाई कार्य आज तहसील कार्यालयात राबविण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री. सुरेशजी कव्हळे सर, नगरपरिषद मुख्यधिकारी श्री. राजू मोत्तेमवार सर यांनी विशेष परिश्रम केले.

"सुंदर माझे कार्यालय अभियान" राज्य शासनांतर्गत सर्व शासकीय कार्यालयामध्ये राबविण्याबाबत मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक कार्यलय हे स्वच्छ सुंदर निटनेटके असावे तसेच तेथील वातावरण नागरिक व कर्मचा-यासांठी काम करण्यायोग्य प्रेरक, उत्साहवर्धक असावे यासाठी संपुर्ण कार्यालय परिसराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली.

मा.जिल्हाधिकारी यांचे अभियनास प्रतिसाद देत आज तहसील कार्यालयात सर्व घाण साफ करणे, कचरा गोळा करून विल्हेवाट लावणे, झाडांची आणि गवत कटाई करणे आणि अनावश्यक प्लास्टिक यांची विलेवाट लावणे इत्यादि कार्ये करण्यात आली.
Previous Post Next Post