सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२६सप्टें.) : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मंजूर केलेल्या कायद्यांना आम आदमी पार्टीचा विरोध असून त्या विरोधात चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आपण सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. या आंदोलनास एक वर्ष पूर्ण होऊनसुद्धा केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढला नसून भाजपा सरकार कडून उपराेक्त आंदोलन मोडून काढण्यासाठी कुटील प्रयत्न केल्या गेले आहेत. आत्तापर्यंत अनेक आंदोलनकर्ते या आंदोलन दरम्यान शहिद झाले असून सुद्धा केंद्र सरकार अत्यंत असंवेदनशील पद्धतीने शेतकऱ्यांशी वागत आहे.
सदरहु आंदोलनास एक वर्ष पूर्ण झाले असून केंद्र सरकारचा निषेध करून तीनही कायदे मागे घेण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी येत्या सोमवार दि. २७ सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. आम आदमी पार्टीचा या बंदला सक्रिय पाठिंबा असून जिल्ह्यातील आपचे पदाधिकाऱी व कार्यकर्ते या आंदाेलनात माेठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवित आहे . शेतक-यांच्या हक्काचे हे आंदोलन असुन ते यशस्वी करावे असे आवाहन आपकडुन आज करण्यांत आले आहे .
उद्याच्या "भारत बंद" आंदाेलनात स्वयंस्फुर्तिंने सहभागी व्हा !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
