सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२६सप्टें.) : जिद्द आणि चिकाटी असेल तर छोट्या गावातील विद्यार्थी देखिल विद्यपीठात चमकू शकतात हे प्रत्यक्षात राजुरा येथील ज्ञानदा हिने दाखवून दिले आहे. तिने आपल्या नावाला साजेशी अशी कामगिरी करीत नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात एक दोन नव्हे तर चक्क सहा पारिताेषिकांची घसघशीत कमाई केली आहे.
तिच्या या पारिताेषिकात प्रामुख्याने श्री शांती रंगराव मेमोरियल सिल्वर मेडल, जोग्राफी साठी बी ए अंतिम वर्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,श्रीमती अनुराधा तांबे स्मृती चषक, भूगोल साठी, रा.तू नागपूर विद्यापीठ, डाँ .स. अय्यंगार स्मृती पारितोषिक इकॉनॉमिक्स सर्वाधिक गुणसाठी रा, तू म. नागपूर विद्यापीठ, श्रीमती लिलाबाई केशव खाकरे स्मृती पारितोषिक अर्थशास्त्र सर्वाधिक गुणासाठी, श्री हरिभाऊ पाळणीतकात स्मृती पारितोषिक अर्थशास्त्र सर्वाधिक गुणासाठी, अलंपल्लम श्रीरण नारायण स्मृती पारितोषिक इकॉनॉमीक्स सर्वाधिक गुणासाठी, रा.तू.म. नागपूर विद्यापीठ (पुरस्काराचा) प्रामुख्याने समावेश आहे.
ज्ञानदाला ही सर्व पारितोषिक घोषित झाले असुन ज्ञानदाने एल.ए. डी. महाविद्यालयातुन बी .ए .ची पदवी विशेष गुणवत्ते सह मिळविली आहे. जपानी भाषा शिकत असलेली ज्ञानदा उर्फ पूर्वा सध्या दिल्ली विद्यापीठात ईस्ट एशियन स्टडीज मध्ये पदवुत्तोर शिक्षण घेत आहे.
राजुरा येथे न्यू इरा इंग्लिश स्कुल व त्या नंतर स्टेला मेरिस कॉन्व्हेंट आणि बनवारी लाल पुरोहित बी.व्ही.एम भवन्स शाळेतून आपले शालेय शिक्षण तिने पूर्ण केले. शांत, संयमी आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेली ज्ञानदा उत्तम वक्ता आहे व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय छात्र संसद ती सतत गाजवत असते. एवढेच नाही तर अनेकदा तिने विद्यापीठ प्रतिनिधीत्व केलेले आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये तिचे अनेक लेख प्रकाशित झालेले आहेत.
ज्ञानदा ही स्वर्गिय ऍड .राम धोटे व धोटे ड्रॉयव्हीग स्कुलच्या संचालिका तथा इंफॅन्ट जीजस येथील शिक्षिका तदवतचं महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका मेघा धोटे यांची ती जेष्ठ कन्या आहे.
विद्यापीठ विभाग प्रमुख. डॉ. दीपाली चहांदे, डॉ रोझलीन मिश्रा, तसेच प्रिन्सीपाल दीपाली कोतवाल आणि प्राध्यापक वृंद यांनी तिच्या यशाचे भरभरुन कौतुक केले आहे.
राजूऱ्याची ज्ञानदा रामकृष्ण धोटे नागपूर विद्यापीठ मध्ये रजत पदक आणि अन्य सहा पुरस्कारांने सन्मानित
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2021
Rating:
