सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०७ सप्टें.) : महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या साेशल मिडीयाच्या संयाेजिका पदी माझी निवड झाली. मी प्रामाणिकपणे व विश्वासाने सहजं सुचलं व्यासपीठाची कामगिरी पार पाडेल. असे मनाेगत चंद्रपूरातील सारीका खाेब्रागडे यांनी आपल्या निवडी नंतर आमच्या प्रतिनिधीशी (भ्रमनध्वनीवर) आज बाेलतांना व्यक्त केले. मी सहजं सुचलंच्या विश्वासाला कदापिही तडा जावू देणार नाही असे, सारीका खाेब्रागडे पुढे म्हणाल्या.
अधिवक्ता वैदर्भिय जेष्ठ लेखिका मेघा धाेटे, समाज सेविका व याेग शिक्षिका मायाताई काेसरे, प्रभा अगडे व सिमा पाटील यांचे मार्गदर्शन आपणांस सदैव लाभले असल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी केला.
सहजं सुचलंच कार्य मी प्रामाणिकपणे व विश्वासाने पार पाडील - सारीका खाेब्रागडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 07, 2021
Rating:
