सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२१ सप्टें.) : गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुण युवकाचा चंद्रपूरच्या ईरइ नदीत बुडून मृत्यू पावल्याची दुखद घटना दि २० सप्टेंबरच्या रात्री घडली. या बाबत प्राप्त माहिती नुसार असे कळते की, गणपती विसर्जना करीता प्रवीण वनकर नावाचा युवक नदीवर गेला हाेता. मंगळवारी त्याचा मृतदेह त्याच नदीत आढळुन आला. विशेष म्हणजे दि.१९ सप्टेंबरला गणेश विसर्जनाच्या निमित्त्याने स्थानिक पोलिस कर्मचारी व मनपा कर्मचारी आपली या नदीवर भक्तांना सेवा देत होते. विसर्जन आटोपल्यावर दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आली.
चंद्रपूर नगरीतील बोकारे प्लॉट रामनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दि.१९ सप्टेंबर अनंत चतुर्दशीला बाप्पाचे विसर्जन न करता दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याचा निर्णय घेतला हाेता.त्यानंतर सोमवारी गणेश विसर्जन मिरवणूक काढत रात्री ९:३० वाजताच्या सुमारास हे मंडळ विसर्जन स्थळी पोहोचले. या मंडळातील सदस्य विसर्जनाच्या निमित्ताने बाप्पाच्या मूर्तीसह उतरले मात्र त्यातील ३ सदस्यांचा तोल सुटला व ते प्रवाहात वाहू लागले. विसर्जनाच्या स्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दोघांना वाचवले. मात्र प्रविण वनकर हा नदीत बुडाला. रात्रभर या तरुणाचा नदीत कसुन शोध घेण्यात आला मात्र प्रवीणचा शाेध लागला नाही. त्यानंतर आज मंगळवारी या तरुणाचा मृतदेह या नदीत दिसून आला.
विसर्जनाला गेला अन् प्राण गमावून बसला, चंद्रपूरातील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 21, 2021
Rating:
