बक्षिस वितरण समारंभ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच आयोजित "गौरी गणपती सजावट स्पर्धा"
सह्याद्री न्यूज | प्रदीप गावंडे
पुणे, (२१ सप्टें.) : निमित्त निगडी प्राधिकरण मधील नागरिकांनसाठी गौरी गणपती सजावट स्पर्धा ऑनलाईन
आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत निगडी प्राधिकरण मधील सर्व नागरिकांनी आपल्या घरातील गौरी गणपती देखाव्याचे छायाचित्र, आपले नाव फोन नंबर व पत्ता, व्हॅटसफ वर पाठवले. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख १५/९/२०२१ पर्यंत होती.
या स्पर्धेस नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला, प्राधिकरण मधील 287 नागरिकांनी सहभाग घेतला. अनेक नागरिकांनी उल्लेखनीय सजावट केली होती त्यामध्ये पहिला, दुसरा, आणि तिसरा क्रमांक दिला व स्पर्धेत सहभागी प्रत्येकास स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरवण्यात आले.
स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रत्येक स्पर्धकांच्या घरी जाऊन देण्यात आले आहे. बक्षिस वितरण गुरुवार दिनांक १६/९/२०२१ ते रविवार दिनांक १९/९/२०२१ पर्यंत रोज चार दिवस स्पर्धेत सहभागी प्रत्येक नागरिकांच्या घरोघरी जाऊन बक्षिस देवुन गौरवण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षिस वितरण, उपशहराध्यक्ष मनसे पिंपरी-चिंचवड शहर बाळा दानवले, महिला प्राधिकरण विचार मंच अध्यक्षा सौ.स्वाती दानवले, सौ. माधुरी ताई पाटोळे, शितलताई कदम, शितलताई बैरागी, सिमाताई शेलार, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, वाॅड अध्यक्ष प्रसाद मराठे, शाखा अध्यक्ष शंतनु चौधरी, रुषिकेस कांबळे च्या हस्ते वितरण करण्यात आले.
१) पहिला क्रमांक, उमेशकुमार हरिकिशन अग्रवाल सजावट, (नारळ मध्ये अष्टविनायक गणपती)
२) दुसरा क्रमांक, विशाल मटके सजावट, ( हिमालय मधील श्री शंकर महादेव मंदीर)
३) तिसरा क्रमांक, अभिषेक चंद्रकांत दाणी सजावट, ( ATM मशीन अध्यात्मिकता स्टेटिंग मशिन) यांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र गुलाब पुष्प देवुन गौरवण्यात आले व स्पर्धे मध्ये सहभागी घेतलेल्या सर्व स्पर्धकांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देण्यात आले.
या स्पर्धे बाबतीत अनेक महिलांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, हि स्पर्धा घेतल्यावर आम्हाला गणपती सजावट करण्यासाठी उत्सुक होऊन सजावट केली व आपण बक्षिस देवुन पुढील वर्षी अजून जोरदार सजावट करण्यासाठी प्रोत्साहन दिले व आपली परंपरा, सन, उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यासाठी या स्पर्धे च्या माध्यमातून बळ मिळाले. अशी प्रतिक्रिया महिलांनी दिल्या व आभार मानले.
मा. बाळा दानवले उपशहराध्यक्ष मनसे पिंपरी-चिंचवड शहर व सौ.स्वाती बाळा दानवले महिला प्राधिकरण विचार मंच निगडी
यांनी केले होते.
बक्षिस वितरण समारंभ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व प्राधिकरण विचार मंच आयोजित "गौरी गणपती सजावट स्पर्धा"
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 21, 2021
Rating:
