महागांव भूमी पुत्र अमन आडे व राजकुमार जाधव यांना राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत "मेडल्स"

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागाव, (२१ सप्टें.) : महागाव तालुक्यातील दोन भुमि पुत्र यांची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवड झाली.
महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे राजकुमार जाधव तर अमन आडे यांनी हरियाना येथे खेळले गेलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळामध्ये रोहतक गोल्ड मेडल्स मिळवून यवतमाळ जिल्ह्यासह महागांव तालुक्याचे नाव उंचावले.

बेलदरी चा सतरा वर्षीय अमन संदीप आडे तर कासारबेहळ-सेवानगर येथील बावीस वर्षीय राजकुमार भिकु जाधव या खेळाडूनी आई वडील यांच्या आशिर्वादाने व लाभलेल्या मार्गदर्शनाने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून राष्ट्रीय स्तरावर खेळल्या गेलेल्या हरियाणा येथील स्पर्धेत मेडल्स चे यश संपादन केले.

या स्पर्धेत १७ वयोगटातून अमन आडे यांना कबड्डीसाठी (सिल्वर मेडल) मिळाला. तर २२ वयोगटातून राजकुमार भिकु जाधव यांना कबड्डीसाठी (गोल्ड मेडल) मिळाला आहे. विशेष म्हणजे, अमन हे कृषी विभागातील आडे साहेब यांचे ते पुतने आहेत, तर राजकुमार हे अत्यंत गरीब कुटुंबातील असून सुद्धा त्यांनी हरियाणा रोहतक मेडल्स मिळवले. त्यामुळे तालुक्याचं नाव या दोघांमुळे आज अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले आहे. त्यामुळे या दोघांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

स्पर्धेतील हरियाणा रोहतक मेडल्स स्पर्धक :

१) सचिन राठोड- (1500 मीटर) वयोगट 22 
२) सूरज पारडे- 🥇गोल्ड मेडल ( शॉर्ट पुट) वयोगट 25
३) मुष्फिक अली-🥈 सिल्व्हर मेडल (भालाफेक) वयोगट 17
४) विकास बरडे-🥈सिल्व्हर मेडल (भालाफेक) वयोगट 19
५) पवन पोपलवाड-🥈 सिल्व्हर मेडल (100 मीटर) वयोगट 17
६) अवेस खान- 🥈सिल्व्हर मेडल (5000/3000 मीटर) वयोगट 19
७) धनंजय ठाकरे- 🥈सिल्व्हर मेडल (1500 मीटर/शॉट पुट) वयोगट 22
८) अंकुश पवार-🥇गोल्ड मेडल (3000 मीटर) वयोगट 19
९) कृष्णा पवार-🥉 ब्राँझ मेडल (800 मीटर) वयोगट 17
१०) प्रथमेश कुंडलकर-🥇गोल्ड मेडल (1500 मीटर) वयोगट 19
१1) अमन आडे 🥈सिल्व्हर मेडल (कबड्डी) वयोगट 17
१२) चेतन जाधव🥈सिल्व्हर मेडल (कबड्डी) वयोगट 17
१३) उदल मुडे 🥇गोल्ड मेडल (कबड्डी) वयोगट 22
१४) पंकज राठोड🥇 गोल्ड मेडल (कबड्डी) वयोगट 22
१४) राजकुमार जाधव 🥇गोल्ड मेडल (कबड्डी) वयोगट 22

असे स्पर्धाकांची नावे आहेत. या स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशन, यवतमाळ च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

~ सागर शेरे
जिल्हा सचिव  
स्टूडेंटस ऑलम्पिक असोसिएशन, यवतमाळ
महागांव भूमी पुत्र अमन आडे व राजकुमार जाधव यांना राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत "मेडल्स" महागांव भूमी पुत्र अमन आडे व राजकुमार जाधव यांना राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत "मेडल्स" Reviewed by सह्याद्री चौफेर on September 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.