जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी किन्हाळा येथील श्री. प्रकाश चौधरी यांची नियुक्ती

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
मारेगाव, (२१ सप्टें.) : मारेगाव तालुक्यातील किन्हाळा  येथील जन सामान्यात परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश चौधरी यांची जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

सदर नियुक्ती हिंगणघाट येथे संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत मा. मंगलाताई ठक जेष्ठ नागरीक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षा यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच श्री. रेवनाथजी देशमुख अहमदनगर यांचीही महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. श्री. प्रकाश चौधरी यांची नियुक्ती विदर्भ अध्यक्ष पदी करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

भविष्यात निराधार संघटन वाढविण्यास व सामाजिक स्तरावर संघटनेच्या माध्यमातून जनतेचे कल्याण करण्याकरिता यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले असून, प्रकाश चौधरी यांनी या अगोदर मारेगाव तालुका परिसरातील गोरगरीब लोकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य करून सर्वसामान्य जनतेत आपले नावं उंचावले असल्यानेच त्यांची नियुक्ती एवढ्या मोठ्या पदावर केली. व त्यांचे कार्य पाहूनच त्यांच्यावर ही जबाबदारी महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षानी दिली असावीत, अशी चर्चा असून त्यांच्या नियुक्ती बद्दल तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.
जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी किन्हाळा येथील श्री. प्रकाश चौधरी यांची नियुक्ती जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी किन्हाळा येथील श्री. प्रकाश चौधरी यांची नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on September 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.