"सर्वांसाठी घरे २०२२" या शासन निर्णायाची अंमलबजावणी करण्यासाठी मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ यांचे नेतृत्त्वात २८५ बेघर लोकांचे मुख्याधिकारी कळंब यांचेकडे अर्ज सादर.

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख 
कळंब, (२१ सप्टें.) : शहरांमध्ये नगर पंचायत कळंब तर्फे शासन निर्णय क्रमांक:- एमयुएन-/२०१८/प्र.क्र.१९७/नवि-२०१८दि.१७ नोंव्हें.२०१८ "सर्वांसाठी घरे २०२२" या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ओमप्रकाश मारोतराव भवरे यांनी १५ आगस्ट २०२१पासुन आमरण उपोषणाचा इशारा दिल्या नंतर नगर पंचायत कळंब खडबडून जागी होवून गरजु बेघर व्यक्तीचे अर्ज मागविण्यात आले होते.  
त्यामुळे मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख व राजुभाऊ मांडवकर यांचे नेतृत्त्वाखाली प्रभाग क्रमांक ९,१०,११, व १२ मधिल शासकीय जागेवर अतिक्रमण करून कच्चे घर बांधून राहत असलेल्या लोकांचे कडून मुख्याधिकारी यांचे नावाने विनंती अर्ज व हमीपत्र लिहून घेवून २८५ अर्ज शासन निर्णयानुसार सन २०११ पुर्विचा रहीवासी पुरावा घेऊन मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख यांचे शुभ हस्ते मा.मुख्याधिकारी नगर पंचायत कळंब यांचेकडे उचित कारवाई करणे करीता सादर करण्यात आले. सादर केलेल्या अर्जावर शासन निर्णयानुसार सकारत्मक भुमिका घेतली जाईल व कोणीही अर्जदार या योजने पासुन वंचित राहणार नाही. असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे.

यावेळी दिगांबर भाऊ मस्के उपजिल्हा प्रमुख, राजुभाऊ मांडवकर, ज्येष्ठ समाजसेवक ज्ञानेश्वरराव मोहनापुरे काकाजी, मा.शारदाताई थोठे उपजिल्हाप्रमुख, निलेश भाऊ मेत्रे शिवसेना तालुका प्रमुख, रोशनभाऊ गोरे शिवसेना शहर प्रमुख, सुनिता ताई डेगमवार नगर सेविका, मारोती भाऊ दिवे नगरसेवक, पंकज भाऊ बांन्ते, दिलीपभाऊ डवरे, रुस्तम शेख, ओमप्रकाश भवरे, राजेश नेहारे, शिवा गांवडे, विजु एकणार, सुनिल मोरे, उमेश शिंदे, राहुल थोरात, राजेश नेहारे, देवानंद शेंद्रे, यांचेसह शेकडो नागरिक हजर होते.
"सर्वांसाठी घरे २०२२" या शासन निर्णायाची अंमलबजावणी करण्यासाठी मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ यांचे नेतृत्त्वात २८५ बेघर लोकांचे मुख्याधिकारी कळंब यांचेकडे अर्ज सादर. "सर्वांसाठी घरे २०२२" या शासन निर्णायाची अंमलबजावणी करण्यासाठी मा.राजुभाऊ गायकवाड शिवसेना जिल्हा प्रमुख यवतमाळ यांचे नेतृत्त्वात २८५ बेघर लोकांचे मुख्याधिकारी कळंब यांचेकडे अर्ज सादर. Reviewed by सह्याद्री चौफेर on September 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.