जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी रेवनाथ देशमुख तर, विदर्भ अध्यक्ष पदी प्रकाश चौधरी यांची निवड
सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (१९ सप्टें.) : ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी श्री रेवनाथ देशमुखजी अहमदनगर, यांची नियुक्ती करण्यात आली तर संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष पदी श्री प्रकाश चौधरी मारेगाव (यवतमाळ) यांची निवड करण्यात आली आहे.ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली. भविष्यात निराधार संघटन वाढविण्यास व सामाजिक स्तरावर संघटनेच्या माध्यमातून जन कल्याण करावे,या हेतूने जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष रमेश जी घोडे व जिल्हाअध्यक्ष योगेश राजूरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी नियुक्ती बद्दल अभिनंदन व्यक्त केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जेष्ठ नागरिक निराधार संघटनेच्या महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी रेवनाथ देशमुख तर, विदर्भ अध्यक्ष पदी प्रकाश चौधरी यांची निवड
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2021
Rating:
