वैष्णीव उर्फ वनश्री हत्याकांड: चंद्रपूरात निघाला कँडल मार्च, "त्या" मारेकरास फाशीची शिक्षा द्या - जनतेची मागणी !



सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१९ सप्टें.) : वैष्णीव उर्फ वनश्री आंबटकर हत्याकांडातील त्या आराेपीस फाशीची शिक्षा द्या, या प्रमुख मागणीसाठी काल शनिवार दि.१८ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजता शहरातील यंग चांदा ब्रिगेडच्या वतीेने चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर येथे कँडल मार्चचे आयोजन करण्यांत आले हाेते. स्थानिक पंचशिल चाैकातुन ही रैली निघाली हाेती. सदरहु कँडल मार्चचे नेत्रूत्व यंग चांदा ब्रिगेड आदिवासी संघटनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यांनी केले हाेते.

या रैलीत इंदिरा नगर येथील शेकडाें पुरुष, महिला, तरुणी व विद्यार्थी सहभागी झाले हाेते. अत्यंत वर्दळीच्या मार्गावर संध्याकाळच्या वेळेस काही दिवसांपुर्वी प्रफुल आत्राम नावाचे एका ३४ वर्षीय युवकाने एकतर्फी प्रेमातुन वैष्णीव उर्फ वनश्रीवर चाकुने सपासप वार केले हाेते. त्यात ती गंभीर जखमी झाली हाेती. नंतर तिला पुढील उपचारार्थ नागपूरात भरती करण्यांत आले हाेते. तिला वाचविण्यांसाठी डॉक्टर मंडळींनी बरेच प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्नाला यश आले नाही. मृत्यूशी झुंज देतांनाच वैष्णीवची प्राणज्याेत मालवली हाेती. या प्रकरणाने शहरातच नव्हे तर अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली हाेती. दिवंगत सतरा वर्षीय अल्पवयीन ही मृतक  तरुणी चंद्रपूरातील एका खासगी रुग्णालयात नर्सचे काम करुन ती आपल्या कुटुंबाचा उदार निर्वाह करीत हाेती. वैष्णीवच्या मारेकरास फाशीची शिक्षा द्या! अशी मागणी आता सातत्याने सर्व स्तरावरुन हाेवू लागली आहे.
 
कालच्या कँडल मार्च मध्ये यंग चांदा ब्रिगेड चंद्रपूर आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, उपाध्यक्ष नरेश आत्राम, रुपेश मुलकावार, सिध्दार्थ मेश्राम, शकील शेख, अशाेक तुमराम, नितेश बाेरकुटे, सतीश साेनटक्के, गणेश इसंनकर, नविन चांदेकर, वैशाली मेश्राम, प्रिती मडावी, नंदिनी मेश्राम, निलिमा चांदेकर, मिनू जमगादे, माधुरी पेंदाेर, उषा मेश्राम, जाेस्त्ना कुळमेथे,आदीं सहभागी झाले हाेते. ज्या दिवशी वैष्णीवचे पार्थिव शरीर नागपूर वरुन चंद्रपूरात आणले हाेते त्या दिवशी बाबूपेठ येथील नेताजी चाैकात काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. आमदार किशाेर जाेरगेवार यांचे मध्यस्थीनंतर वातावरण शांत झाले. परंतु आज ही या प्रकरणाबाबत नागरिक आपला संताप व्यक्त करीत असल्याचे दिसून येते.
जाे पर्यंत ख-या अर्थाने मृतक वैष्णीवला न्याय मिळणार नाही ताे पर्यंत येथील जनता शांत बसणार नाही असे यंग चांदा ब्रिगेड आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे यावेळी म्हणाले.
वैष्णीव उर्फ वनश्री हत्याकांड: चंद्रपूरात निघाला कँडल मार्च, "त्या" मारेकरास फाशीची शिक्षा द्या - जनतेची मागणी ! वैष्णीव उर्फ वनश्री हत्याकांड: चंद्रपूरात निघाला कँडल मार्च, "त्या" मारेकरास फाशीची शिक्षा द्या - जनतेची मागणी ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.