विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तावर मधमाश्यांनी केला हल्ला! ,सालेभट्टी येथील घटना

सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१९ सप्टें.) : मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी येथील गावाशेजारी असलेल्या बळीराम लोनसावळे यांच्या शेतामध्ये घरगूती गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेल्या गणेश भक्तावर मधमाश्यांनी हल्लाबोल केला. ही घटना आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडल्याचे समजते. दरम्यान, एकच भक्तांची तारांबळ उडाली.

आज दि.१९ सप्टेंबरला मंगेश मिलमिले, छत्रपती घुंगरूड यांच्या घरचे गणपती विसर्जन करण्यासाठी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गेलेल्या पंधरा गणेश भक्तांवर अचानक मधमाश्यांनी हल्लाबोल केल्याने विसर्जन कर्त्यांना गणेश मूर्ती ठेवून आप आपला जिव वाचविण्यासाठी सैरावैरा पडत गावाच्या दिशेने धाव घ्यावं लागली. यामध्ये पंधरा गणेश भक्त जखमी झाले असुन, जखमींना मारेगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठविण्यात आले होते, मात्र सर्वांची तब्येत धोक्याबाहेर असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली. त्यानंतर गणपती विसर्जन ११ वाजता करण्यात आले आहे.
 

विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तावर मधमाश्यांनी केला हल्ला! ,सालेभट्टी येथील घटना विसर्जनासाठी गेलेल्या गणेश भक्तावर मधमाश्यांनी केला हल्ला! ,सालेभट्टी येथील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on September 19, 2021 Rating: 5
Powered by Blogger.