चंद्रपूरात अल्पवयीन तरुणीवर चाकु हल्ला; प्राणज्याेत मालवलेल्या वैष्णवी उर्फ वनश्रीच्या मारेकरास कठाेर शिक्षा द्या - पाेलिस अधिक्षकांना नागरिकांचे निवेदन सादर !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (१६ सप्टें.) : चंद्रपूरातच नव्हे तर अख्ख्या विदर्भात खळबळ उडुन देणां-या चाकु हल्ला प्रकरणातील त्या आराेपीस कठाेर शिक्षा व्हावी या साठी सर्व स्तरावरुन मागणी आता जाेर धरु लागली आहे.
दरम्यान या चाकु हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबूपेठ येथील वैष्णवी उर्फ वनश्री या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीची नागपूरात दि.१२सप्टेंबरला उपचार सुरु असतानाच प्राणज्याेत मालवली हाेती. दि.९ सप्टेंबरला चंद्रपूर महाकाली मंदिर परिसरात एका वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर प्रफुल आत्राम या ३४ वर्षीय युवकांने तिक्ष्ण चाकुने त्या तरुणीवर सपासप वार करुन तिला गंभीर जखमी केले हाेते. ह्या ह्रदयद्रावक घटनेची बातमी शहरात वा-यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी लाेटली हाेती. एक तर्फी प्रेमातुन हे प्रकरण घडल्याची गावभर चर्चा असुन, या प्रकरणात चंद्रपूर पाेलिसांनी आराेपीला तात्काळ अटक केली आहे. सध्या आराेपी प्रफुल पाेलिसांच्या ताब्यात आहे. बाबुपेठ येथील मुळ रहिवाशी असणारी वैष्णीव ही अशाेक आंबटकर यांची सर्वात माेठी कन्या असुन तिचे वडील आटो व्यवसाय करीत असल्याचे समजते. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ही तरुणी येथील स्थानिक एका खासगी रुग्णालयात नर्सचे काम करीत हाेती. तिची आई शारदा आंबटकर ही एका बचत गटाचे काम बघत असल्याचे समजते. वैष्णीवच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच बिकट व हलाकीची आहे.
शहरातील काही सामाजिक व राजकीय संघटनेची मंडळी तिच्या निवासस्थानी भेटी देवून घटनेची खरी परिस्थिती जाणून घेत असल्याचे वृत्त आहे. नुकतीच खासदार बाळा धानाेरकर यांनी आंबटकर यांचे घरी भेट देवून त्यांचे परिवारास आर्थिक मदत दिल्याचे सामाजिक कार्यकर्त्या चंदा वैरागडे यांनी या प्रतिनिधीशी बाेलतांना आज गुरुवारी दुपारी सांगितले. सदरहु प्रकरणाच्या अनुषंगाने मनपा नगर सेवक वसंत देशमुख, विश्वास झाडे, अधिवक्ता विजय माेगरे, डॉ अजयभाऊ वैरागडे, प्रदीप किरमे, महेश मॅकलवार, सचिन आक्केवार, प्रवीण खनके, हनुमान चाैके, उमंग हिवरे, प्रदीप खनके, बालू खनके, रवि खनके, राजू कुडे, मुकेश गाडगे, शैलेश जुमडे, जितू इटनकर रवि लाेणकर , पियुष धाेपे, महेश वासलवार, चंदा वैरागडे आदींनी या घटनेतील आराेपीवर कठाेर कारवाई करण्यांची मागणी केली आहे .
जाे पर्यंत ख-या अर्थाने दिवंगत वैष्णीवला न्याय मिळत नाही ताे पर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या चंदा वैरागडेसह अनेकांनी आज दिला आहे. याच प्रकरणाच्या बाबतीत एका शिष्ट मंडळाने चंद्रपूरचे पाेलिस अधिक्षक यांची प्रत्यक्ष भेट घेवून त्यांचेशी चर्चा केली व त्यांना एक लेखी निवेदन सादर केले .
चंद्रपूरात अल्पवयीन तरुणीवर चाकु हल्ला; प्राणज्याेत मालवलेल्या वैष्णवी उर्फ वनश्रीच्या मारेकरास कठाेर शिक्षा द्या - पाेलिस अधिक्षकांना नागरिकांचे निवेदन सादर !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 16, 2021
Rating:
