ग्रामसेवीकेला कार्यालयात कुलुपबंद करणाऱ्याला तत्काळ अटक करा, म. रा. ग्रामसेवक संघटनेच्या वणी शाखेची मागणी
सह्याद्री न्यूज : प्रशांत चंदनखेडे
वणी, (१६ सप्टें.) : तालुक्यातील बाबापूर ग्रामपंच्यायतेमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवीकेला गावातीलच एका युवकाने अरेरावी करत कार्यालयातच कुलुपबंद केल्याची धक्कादायक घटना 14 सप्टेंबरला सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास बाबापुर ग्रामपंचायतेमध्ये घडली. ग्रामसेवीकेला अश्लील शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देत ग्रामपंच्यायत कार्यालयात कुलुपबंद करणाऱ्या आरोपीला अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ 1370 वणी शाखेच्या वतीने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे. या अपमानजनक व अपकृत्याची सदर ग्रामसेवीकेने मुकुटबन पोलिस स्टेशनलाही तक्रार नोंदविली आहे. स्मिता गणेश काळे (33) रा. मुकुटबन, ह.मू. बाबापूर या बाबापूर ग्रामपंचायतेमध्ये ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत. बाबापूर येथीलच सचिन मोहन पिदूरकर (45) हा नेहमी ग्रामसेवीकेकडे कोणती ना कोणती माहिती मागत असतो. ग्रामसेवीका त्याला आवश्यक ती माहितीही देत असते. 14 सप्टेंबरला सचिन पिदूरकर हा ग्रामपंचायत कार्यालयात आला, व शाळाकरी मुलांकरीता गावातून एसटी बस सुरु करण्याचा ठराव पारित करुन एसटी डेपोला का दिला नाही असे म्हणत माहितीच्या आधिकारात माहिती दिली नाही, असे अरेरावीने विचारु लागला. ग्रामसेवीकेने त्याला माहितीच्या आधिकारातील माहिती मिळविण्याकरिता लिखित अर्ज सादर करण्यास सांगितले असता सदर युवकाने ग्रामसेवीकेलाच शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार ग्रामसेवीकेने पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. सचिन पिदूरकर एवढ्यावरच थांबला नाही, तर ग्रामसेवीकेसह चपराशी व इतर दोघांना त्याने कार्यालयात बंद करून बाहेरुन कुलुप लावले. या सर्व प्रकाराने घाबरलेल्या ग्रामसेवीकेने ग्रामविस्तार अधिकारी व उपसरपंच यांना फोन करुन घडलेल्या घटनेची महीती दिली. उपसरपंच यांनी तत्काळ ग्रामपंचायतेमध्ये येऊन ग्रामसेवीकेला कार्यालयातून बाहेर काढले. सचिन पिदूरकर याने केलेल्या या कृत्याची त्यांनी मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. तसेच ग्रामसेवक संघटनांनाही घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना 1370 वणी शाखेच्या वतीने या शाखेचे अध्यक्ष मिलिंद माने यांच्या नेतृत्वात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गायणार यांना निवेदन देऊन ग्रामसेवीकशी असभ्य वर्तवनुक करणाऱ्या सचिन पिदूरकर याला अटक करण्याची मागणी केली आहे.
ग्रामसेवीकेला कार्यालयात कुलुपबंद करणाऱ्याला तत्काळ अटक करा, म. रा. ग्रामसेवक संघटनेच्या वणी शाखेची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 16, 2021
Rating:
