ग्रामसेवीकेला कार्यालयातच केले कुलुपबंद, बाबापूर येथील घटना

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 
वणी, (१५ सप्टें.) : वणी पंचायत समिती अंतर्गत येणार्या बाबापूर ग्रामपंचायतेमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवक महिलेला तेथीलच एका उर्मट युवकाने शिविगाळ करित ग्रामपंचायतेमध्ये डांबून ठेवल्याची घटना काल 14 सप्टेंबर ला घडली. सदर ग्रामसेवीका ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाज करित असतांना हा युवक त्याठिकाणी आला, व त्यांच्याशी वाद घालुन शिविगाळ करू लागला. तो एवढ्यावरच न थांबता त्याने ग्रामसेवीकेच्या टेबलावरील कुलुप उचलून त्यांना त्यांच्याच कार्यालयात कुलुप बंद केले. या गंभीर प्रकरणाची तालुका ग्रामसेवक संघटनेने दखल घेतली असून त्या उर्मट युवकाला अटक करण्याची मागणी केली आहे. त्या युवकाला जोपर्यंत अटक होणार नाही, तोपर्यंत कार्यालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. तसेच ग्रामसेवीकेनेही सदर युवका विरुध्द मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. 
मुकुटबन येथील रहिवासी असलेल्या व बाबापुर ग्रामपंचायतेमध्ये ग्रामसेवीका म्हनुन कार्यरत असलेल्या स्मिता गणेश काळे (33) यांच्याशी उर्मटपणे वागून त्यांना शिविगाळ करित त्यांच्याच कार्यालयात त्यांना कुलुपबंद करुन शासकीय कामकाजात हस्तक्षेप कर्णार्या सचिन मोहन पिदूरकर (45) रा. बाबापूर याच्या विरुध्द सदर ग्रामसेवीकेने मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. तसेच वणी तालुका ग्रामसेवक संघटनेलाही त्या ग्रामसेवीकेने आपबिती सांगितल्याने संघटनेने आरोपीला अटक होईस्तोर कार्यालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गटविकास अधिकारी गायणार यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. बाबापूर ग्रामपंचायतेच्या ग्रामसेवीका स्मिता काळे या आपल्या कार्यालयात कार्यालयीन कामे करित असतांना त्याठिकाणी गणेश पिदूरकर हा युवक आला, व गावातून एसटी बस सुरु करण्याकरिता ग्रामसभेचा ठराव पास करुन डेपोला का नाही पाठवला असे म्हणत माहितीच्या आधिकाराखाली महीती का दिली नाही, अशी अरेरावीने विचारणा करू लागला. ग्रामसेवीकेने माहितीच्या आधिकाराकरीता लिखित अर्ज सादर करण्यास सांगितले असता गणेश पिदूरकर याने लिखित अर्ज करणार नही, पण तुम्हाला पाहुन घेईन असे म्हणत तेथील चपराशी व कार्यालयात आलेल्या दोन व्यक्तींसह ग्रामसेवीका स्मिता काळे यांना कार्यालयातच डांबले. हा प्रकार ग्रामसेवीकेने ग्रामविस्तार अधिकारी यांना फोन करुन सांगितला. तसेच उपसरपंच यांना देखील सांगितला. उपसरपंच यांनी त्तेथे येऊन यांची ग्रामपंचायतेच्या कार्यालयातून सुटका केली. त्यानंतर त्यांनी मुकुटबन पोलिस स्टेशन गाठुन घफ्लेल्या प्रकाराबद्दल पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. तसेच तालुका ग्रामसेवक संघटनेला घडलेला प्रकार सांगितला. ग्रामसेवक संघटनेने आरोपीला अटक करणार नाही, तोपर्यंत कार्यालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे.
ग्रामसेवीकेला कार्यालयातच केले कुलुपबंद, बाबापूर येथील घटना ग्रामसेवीकेला कार्यालयातच केले कुलुपबंद, बाबापूर येथील घटना Reviewed by सह्याद्री चौफेर on September 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.