सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार
केळापूर, (१५ सप्टें.) : पांढरकवडा येथे आज दिनांक १५ नोव्हेंबर 2021रोजी कर्तव्यदक्ष व कार्यरत माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री दिलीप पाटील भुजबळ साहेब यांचा वाढदिवस पांढरकवडा येथील वृद्धाश्रमात दिव्यांग, अपंग, वयोवृद्ध, गरीब,गरजू, लोकांमध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी गरजू लोकांना फळवाटप करून वृद्धाश्रम दिव्यांग अपंग लोकांना भोजनाची व्यवस्था करून अतिशय साध्या स्वरूपामध्ये हा कार्यक्रम जनतेला एक चांगला संदेश देण्यासाठी आपला वाढदिवस साजरा केला.
यावेळी मा .श्री प्रदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, पांढरकवडा मा .श्री राम कृष्ण महल्ले, पोलीस निरीक्षक साहेब पोलीस स्टेशन पांढरकवडा व सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय, श्री अमोल कोळी व एपीआय महाले साहेब हे उपस्थित होते.
मा.जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांचा वाढदिवस साजरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 15, 2021
Rating:
