डॉ.सातमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सगरोळी परिसरात लसीकरणाला उत्सर्फूत प्रतिसाद


सह्याद्री न्यूज | गौतम गावंडे 
बिलोली, (१५ सप्टें.) : तालुक्यातील मौजे सगरोळी सगरोळी, बोळेगाव, कार्ला, हिप्परगा, केसराळी, येथील गणेश महोत्सव निमित्त गणेश मंडळ पदाधिकारी व कार्यकर्ते याना संपर्क साधुन कोरोना लसीचे महत्व पटवुन देउन सगरोळी प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरातील उपकेद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना प्रतिबंधात्मक आयोजित कोव्हीड लसीकरण मोहिमेत भक्तगण व नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत विविध गणेश मंडळाकडून एकूण ७०० नागरीकांनी लस घेतले. सर्व प्रथम श्री गणरायाचे पुजा व आरती करून या कॅम्पकडून लोकांना लस देण्यास बाल गणेश मंडळ,मधला मारोती मंदीर सगरोळी येथे कोव्हीड लस घ्या म्हणून पहिल्यांदा लोकांना व्हॉटसपच्या माध्यमातून आपल्या संदेशातून लोकांना आव्हान केली होती. या माध्यमातून कोव्हीड लस घेण्यासाठी लोकांनी पहिली लस तर कुणी दुसरा लस (डोस) घेऊन उत्सर्फृत प्रतिसाद दिला. यामध्ये सर्व गणेश मंडळानी हा कार्यक्रम डाॅ.बालाजी सातमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२ सप्टेंबर रोजी पासुन मंडळाच्या वतिने लसीकरण आयोजित करण्यात आले. यात भक्तगण कोव्हीड लसीकरण लस घेतले. विविध गणेश मंडळाच्या वतीने कोव्हीड -19 लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय डॉ. बालाजी सातमवाड यांच्या मार्गदर्शना खाली उपस्थितीत आरोग्य पथक टिमच्या माध्यमातून आनेक लोकांनी यामध्ये आपली सहभाग नोंदवून कोव्हीड लसीकरण करून घेतली. या मुळे येनार्‍या काळात सगरोळी व सगरोळी परिसरात कोरनाला हद्दपार करण्यासाठी चालु असलेले प्रर्यत्नामुळे सगरोळी प्राथमिक केद्राचे डाॅ.बालाजी सातमवाड व त्याच्या संपुर्ण स्टाॅफचे सर्व गणेश मंडळ व सगरोळी गावकर्‍याचे वतीने सत्कार करण्यातत आले.या वेळी ग्राम पंचायत सदस्य व बाल गणेश मंडळाचे पदाधिकारी व गावकरी उपस्थीत होते. या वेळी सगरोळी परिसरातील १८ ते ४४  वयोगटातील लोकांनी
या कॅम्प मध्ये सहभागी होउन जास्ती जास्ती लसिकरण करुन घ्या असे अव्हान डाॅ.सातमवाड यानी केले आहे.

आज रोजी बाल गणेश मंडळ मधला मारोती मंदीर याच्याकडुन दुपार पर्यत १७० लोकांनी आपले सहभाग नोंदवून कोव्हीड लस घेतली. मोहिम यशस्वीतेसाठी गावातील सर्व गणेश मंडळाने सहकार्य केले आहे.
डॉ.सातमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सगरोळी परिसरात लसीकरणाला उत्सर्फूत प्रतिसाद डॉ.सातमवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सगरोळी परिसरात लसीकरणाला उत्सर्फूत प्रतिसाद Reviewed by सह्याद्री चौफेर on September 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.