वारी सामाजिक संस्थाचे वतीने जागतिक ओझोन दिवसा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१५ सप्टें.) : ओझोन वायुचा थर पृथ्वीचे सुरक्षा कवच म्हणून कार्य करतो. सूर्य पृथ्वीवरील संपूर्ण सजीवांसाठी फार मोठे वरदान जरी असला तरी त्यापासून निघणारी अतिनील किरणे संजीवांच्या आरोगयास फार धोकादायक आहेत. मात्र ही अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे वातावरणात शोषून घेतल्या जातात. त्यामुळे ओझोन वायूचे संजीव व पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अनण्यासाधारण महत्व लक्षात घेणे फार जारजेचे आहे. बालकांना लहान वयात पर्यावरण जतन व संवर्धनाचे मूल्य रुजावे या दृष्टिकोनातून वारी सामाजिक बहुउद्देशीय संस्था ,चंद्रपूर च्या वतीने संस्थेने ऑनलाइन माध्यमाद्वारे बाळकांच्या विविध स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. 
सहभागी बालकांना संस्थेद्वारे डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल त्याच बरोबर बॉटनिकल गार्डन,बल्लारपूर येथे अभ्यासदौरा आयोजित केला जाईल.तरी आपण या स्पर्धांमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विजय खनके, सचिव प्रियंका सुरेश वैरागडे, सदस्य स्नेहल अंबागडे, सोणाली पोहाणे, मयूरी बालपांडे, गणेश पोहाणे, नरेंद्र मोगरे, भारत लाकडे, सुचिता येनूरकर, चंदा येरणे, सल्लागार अतुल पोहाणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 7620734615 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. 
wareesocial@gmail.com
वारी सामाजिक संस्थाचे वतीने जागतिक ओझोन दिवसा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन वारी सामाजिक संस्थाचे वतीने जागतिक ओझोन दिवसा निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 15, 2021 Rating: 5
Powered by Blogger.