टॉप बातम्या

"स्त्री सक्षमीकरण" अंतर्गत इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा चा स्तुत्य उपक्रम


सह्याद्री न्यूज : कालू रामपुरे 
वरोरा, (१५ सप्टें.) : आपल्या महिलांचे खरोखरच सक्षमीकरण करायचे असेल तर त्यांना आथिर्कदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. हे ध्यानात घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा ने तीन गरजू महिलांना शिवणकला चे प्रशिक्षण देत शिलाई मशीन चे वाटप केले. त्यांच्या कडून मास्क व कापडी पिशव्या तयार करून त्यांचे वाटप इनरव्हिल क्लब तर्फे भाजी विक्रेत्यांना करण्यात येईल तसेच क्लब च्या प्रत्येक सदस्या प्रत्येकी पाच ब्लाऊज त्यांच्या कडून शिवून घेणार आहेत, छेचाळीस महिलांद्वारे जवळपास अडीचशे ब्लाऊज शिवून घेणार आहेत यामुळे या महिलांना रोजगार उपलब्ध होईल व त्या आथिर्कदृष्ट्या सक्षम होतील.
            
इनरव्हिल क्लब च्या अध्यक्षा मधू जाजू, सेक्रेटरी वंदना बोढे, सुचेता पद्ममावार, झेनब सिद्दिकोट , स्नेहल पत्तीवार, दिपाली माटे, प्राजक्ता कोहळे, मानसी चिकनकर, हर्षदा कोहळे, सारिका बावने, अपेक्षा पांपट्टीवार, दिपाली बावने, माया बजाज, कविता बाहेती व अन्य सदस्या उपस्थित होत्या.
Previous Post Next Post