सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (१० सप्टें.) : शहरातील एका मंदिरात पूजेसाठी गेलेल्या वृद्ध महिलेला ठगऊन तिच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करणाऱ्या पाचही आरोपींना डीबी पथकाने अटक केली आहे. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून वणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे पाचही आरोपी मध्यप्रदेशातील भोपाळ येथील रहिवाशी आहेत.ठगबाजी करून लुटणाऱ्यांची ही टोळीच असून डीबी पथकाने या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपींना न्यायालयात हजार केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. वणी बरोबरच हिंगणघाट व चंद्रपूर येथीलही नागरिकांना ठगविल्याचे पोलिस तपासात आरोपींनी काबुल केले आहे. पांढुर्णा येथेही आरोपी दरोडा घालण्याच्या तयारीत असतांना तेथील पोलिसांनी त्यांना अटक केली. अटकेदरम्यान त्यांनी वणी येथे महिलेची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची कबुली दिली. त्यावरून पांढुर्णा विशेष न्यायालयाने गुन्हा ट्रान्सफर करून प्रकरणाचा तपास करण्याकरिता आरोपींना वणी पोलिसांच्या स्वाधीन केले.
शहरातील जुनी स्टेट बँक जवळील श्रीराम मंदिराजवळ रहात असलेली सुनंदा अरविंद वैद्य (७५) ही वृद्ध महिला श्रीराम मंदिरात पूजा करण्याकरिता गेली असता एका ठगबाजाने आपल्या दुकानाचे आज ओपनिंग असल्याचे कारण सांगत सदर वृद्ध महिलेला दुकानाच्या भरभराटी करिता पूजा मांडण्याचा बनाव करून त्यांच्या हस्ते ११०० रुपये मंदिराला दान देण्याची विनंती केली. भोळ्या भाबळ्या या महिलेने त्याची विनंती मान्य करून त्याच्यासाठी पूजा मांडली. नंतर त्याने त्यांच्या अंगावरील दागिने पूजेत ठेवण्यास सांगितले. त्यांनी आपल्या गळ्यातील सोन्याची मोहन माळ व हातातील दोन सोन्याच्या बांगड्या पूजेत ठेवल्या. संधी साधून ठगबाजाने दागिने गुंडाळून पोबारा केला. ४० ग्राम वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे दागिने ठगबाजी करून लुटल्याची तक्रार सदर महिलेने ४ सप्टेंबरला पोलिस स्टेशनला नोंदविली. पोलिसांनी तपास चक्रे फिरवत ठगबाजीच्या या प्रकरणाचा अखेर छडा लावला. खबऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे छिंदवाडा पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून पांढुर्णा पोलिसांशी संपर्क साधला. पांढुर्णा पोलिसांनी ठगवणूक व फसवणूक करणाऱ्या पाच आरोपींना ताब्यात घेतल्याचे सांगत आरोपींनी वणी येथीलही महिलेची फसवणूक केल्याचे काबुल केले आहे. पांढुर्णा पोलिसांकडून ही माहिती मिळताच डीबी पथकाचे सपोनि आनंदराव पिंगळे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकाने पांढुर्णा येथे जाऊन पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्यावर वणी पोलिस स्टेशनला भादंविच्या कलम ४२० अंतर्गत तर पांढुर्णा पोलिस स्टेशनमध्ये भादंवि च्या कलम ३९९, ४२० व सहकलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये वसिम अब्बास सिराज (३७) रा. कल्याण, मुंबई, माशा अल्लाह मुनब्बर अली (३२) रा. बुडार टी.टी. नगर जि. शहडोल, मुख्तार अली पिल्लू अली (३८) रा. भोपाल, जितेंद्र गोकुळ प्रसाद (३०) रा. भोपाल, गंगाराम नंदाराम नरबरिया (४५० रा. भोपाल यांचा समावेश आहे. या ठगबाजांनी महिलेला ठगऊन लंपास केलेला मुद्देमाल पांढुर्णा पोलिसांनी जप्त केला आहे. सदर गुन्हा वणी पोलिस स्टेशनला ट्रान्सफर करून पुढील तपासाकरिता पाचही आरोपींना वणी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हा पोलिस अधिक्षक खंडेराव धरणे, एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथकाचे सपोनि आनंदराव पिंगळे, पोहवा सुदर्शन वानोळे, पोना सुनिल खंडागळे, हरिन्द्रकुमार भारती, पोकॉ पंकज उंबरकर, दिपक वान्ड्रूसवार, विशाल गेडाम, मो. वसिम यांनी केली.
वृद्ध महिलेला ठगऊन तिचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपींचा डीबी पथकाने लावला शोध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 10, 2021
Rating:
