चंद्रपूर शहरात आज अनेक घरी गणपतींची प्रतिष्ठापना !

सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (१० सप्टें.) : एकीकडे जगभर काेराेनाचे संकट सुरु जरी असले तरी आज शुक्रवारला चंद्रपूर शहरातील बाजारपेठेत मुर्तिकारांकडे गणेश भक्तांची गणपतींच्या छाेट्या मुर्त्यां खरेदीसाठी गर्दी असल्याचे चित्र प्रत्यक्षात बाजारात व मुर्ती कलाकारांकडे दिसून आले.
   
अवघ्या भक्तांचा लाडका दैवत अर्थात गणपती असुन त्यांची प्रतिष्ठापणा आज चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात घराेघरी करण्यात आली. दरम्यान दरवर्षी चंद्रपूरातील शेकडाें सार्वजनिक गणेश मंडळ गणेश उत्सव साजरी करण्यांची परवानगी घेत असे, परंतु या वेळी बाेटावर माेजण्यां इतक्याच सार्वजनिक गणेश मंडळाने हा उत्सव साजरा करण्याची रितसर परवानगी घेतल्याचे वृत्त आहे. सलग दुस-या वर्षी देखिल महाभयानक काेराेनाचे संकट जिल्ह्यात आहे. त्यामुळे साहजिकचं गणेश भक्तांचा आनंदावर विरजन पडले आहे! हे मात्र, तेव्हढेचं खरे आहे. काेराेना संकटामुळे शहरासह जिल्ह्यातील मुर्ती कारांना ख-या अर्थाने फटका बसला आहे. या शिवाय स्थानिक फुल व हार विक्रेत्यांना सुध्दा बसला आहे. माेठ्यां हारांना या वर्षी मागणीच झाली नसल्याचे अनेक हार विक्रेत्यांनी एका भेटीत आमच्या प्रतिनिधीस सांगितले.

छाेट्या घरगुती गणपतीच्या हारांना चांगली मागणी हाेती असेही काही हार विक्रेते या वेळी म्हणाले. हॉटेल मधील गाेड पदार्थांना दरवर्षी प्रमाणे या वर्षी ब-या पैकी मागणी हाेती. आज चंद्रपूरची बाजारपेठ गर्दीने फुलली हाेती. दहा दिवस चालणां-या या गणेश उत्सव निमित्त पाेलिस प्रशासनाने जिल्हाभर पाेलिस बंदाेबस्ताची चाेख व्यवस्था ठेवली आहे. बंदाेबस्तासाठी दाेन हजार पेक्षा अधिक पाेलिस तैनात करण्यांत येणार असल्याचे समजते. ग्रामीण भागातही काेराेना संकटामुळे गणेश भक्तगणात निरुत्साह दिसून आला आहे.
 
शहरातील बाजारपेठत आकर्षक व मनाेवेधक सजावटीचे साहित्य माेठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. याच दरम्यान शहरातील हिरव्या भाज्यांचे व पत्रावळीचे दर बरेच आज वाढले असल्याचे दिसून आले.
चंद्रपूर शहरात आज अनेक घरी गणपतींची प्रतिष्ठापना ! चंद्रपूर शहरात आज अनेक घरी गणपतींची प्रतिष्ठापना ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.