मागील पंधरा दिवसांपासून अक्खा गाव अंधारात


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१० सप्टें.) : आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळख असलेला मारेगाव तालुक्यातील महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे सालई पोड येथील आज रोजी नागरिक अंधारात आहे. 

याबाबत खंडणी गट ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडमेथे यांनी नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले आहे. मागील १५ दिवसांपासून महावितरणच्या गलथान कारभारांमुळे सालईपोड गाव अंधारात असल्याने संतापलेल्या गावाकऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन महावितरण कार्यालय गाठले व १५ दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्याचे सांगितले.

यावेळी खंडणी गट ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडमेथे, राहुल आत्राम, चेतन टेकाम, अय्या टेकाम, रामकृष्ण टेकाम, रामा आत्राम, यासह अनेक महिला व युवक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, उपकार्यकारी अभियंता यांना निवेदनातून मागील १५ दिवसांपासून विद्युत पुरवठा बंद असल्याचे अवगत करून जीवनाशक्य पाणीपुरवठा बंद झाला आहे. पावसाळा सुरु आहे. तालुक्यात विविध आजाराचे थैमान असतांना पिण्यास योग्य पाणी मिळणे ही मोठी गंभीर समस्या निर्माण झाली असून, येथील खंडित विद्युत पुरवठा पूर्ववत करुन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.


मागील पंधरा दिवसांपासून अक्खा गाव अंधारात मागील पंधरा दिवसांपासून अक्खा गाव अंधारात Reviewed by सह्याद्री चौफेर on September 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.