गणपतीची स्थापना करून निसर्ग वाचवण्याचा संदेश कु.श्रेया चौधरी हिने दिला

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
वणी, (१० सप्टें.) : आपलं प्रत्येकाचं गणपती बाप्पाशी खास असं नातं असतं. विघ्नहर्त्या गजाननाचे भक्त असणारे अनेक निसर्ग प्रेमीही त्याच्याशी घट्ट जोडले गेले आहेत.

यंदाचा गणेशोत्सव खूप वेगळ्या पद्धतीनं साजरा होतोय. रस्त्यांवरची लगबग, मिरवणुका, जल्लोष यातलं काहीही आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे अगदी चुकल्याचुकल्यासारखं होतंय. पण, या सगळ्या गंभीर वातावरणातही एक सकारात्मक गोष्ट आहे, ती म्हणजे आपण निसर्गाची काळजी घेतोय.

प्रदूषणाचं प्रमाण खूप कमी झालं आहे. पर्यावरणपूरक पद्धतीनं उत्सव साजरा होतोय, याचा आनंद आहे. त्यामुळे या कोविड च्या काळात ऑक्सिजनचे महत्व जाणून पिंपळाच्या झाडाखाली गणपतीची स्थापना करून तसेच निसर्ग वाचवण्याचा संदेश कु.श्रेया हेमंत चौधरी हिने दिला आहे.

पुढच्या वर्षीही अशाच प्रकारे पर्यावरणाचं नीट भान राखत, आपण अधिक उत्साहात गणेशोत्सव साजरा करू शकू, असा विश्वास वाटतो. अशी श्रेया "सह्याद्री न्यूज" ला बोलतांना सांगितले. 
गणपतीची स्थापना करून निसर्ग वाचवण्याचा संदेश कु.श्रेया चौधरी हिने दिला गणपतीची स्थापना करून निसर्ग वाचवण्याचा संदेश कु.श्रेया चौधरी हिने दिला Reviewed by सह्याद्री चौफेर on September 10, 2021 Rating: 5
Powered by Blogger.