सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (२७ सप्टें.) : अवैधरित्या विदेशी दारूचा साठा बाळगणाऱ्याला डीबी पथकाने अटक केली आहे. मोपेड दुचाकीने विदेशी दारूचा साठा घेऊन जातांना स्थानिक भगतसिंग चौकात हा आरोपी डीबी पथकाला आढळून आला. त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्याची चौकशी करित दुचाकीची झडती घेतली असता त्यात विदेशी दारूच्या शिश्या आढळून आल्या. अवैध विक्रीकरिता दुचाकीने विदेशी दारू घेऊन जाणाऱ्या बाबू विश्वनाथ गोलापेल्लीवार (३६) रा. करनबार दीपक चौपाटी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळून ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. डीबी पथक शहरात गस्त घालत असतांना त्यांना भगतसिंग चौकात एक व्यक्ती मोपेड दुचाकीने संशयास्पद स्थितीत जातांना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून त्याची चौकशी करत मोपेड दुचाकीची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारूच्या ७५० मिली. च्या ३, १८० मिली. च्या १०, व ९० मिली. च्या ३३ शिश्या आढळून आल्या. पोलिसांनी त्याच्या जवळून ६ हजार ३१५ रुपये किमतीची विदेशी दारू व मोपेड दुचाकी किंमत ५० हजार रुपये असा एकूण ५६ हजार ३१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवधरीत्या दारूचा साठा बाळगणाऱ्या बाबू गोलपेल्लीवार या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर म.दा.का. च्या कलम ६५(अ)(ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर कार्यवाही एसडीपीओ संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के, डीबी पथकाचे पोउपनि आनंदराव पिंगळे, डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, अशोक टेकाळे, रत्नपाल मोहाडे, हरिन्द्रकुमार भारती, पंकज उंबरकर, दीपक वान्ड्रूसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, वसीम शेख यांनी केली.
अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्याला डीबी पथकाने केली अटक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
