आमदार भीमराव केराम यांच्या माहुर येथील भाजपा कार्यालयात जन तक्रार निवारण कॅम्प सुरु करताच २०० तक्रार प्राप्त
सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (२७ सप्टें.) : आज दिनांक २७ रोजी आमदार भीमराव केराम यांनी माहुर येथे दर सोमवारी भाजपा माहुर कार्यालयात जनसंपर्क करून जन तक्रार निवारण कॅम्प सुरु केले असून, आज प्रामुख्याने विजवितरण कंपनी च्या २०० हुन अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. शिवाय पं.स. घरकुल बिले, विहीर योजनाबाबत पशु वैद्यकीय सुविधा व कर्मचारी हजर नसल्याबाबत तर तहसील कार्यालयात अपंग, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजनाबाबत कर्मचारी उपलब्ध हजर राहून माहिती सांगत नाही, विविध प्रमाणपत्र वेळेवर मिलत नाही तर, आरोग्य विषयक ग्रामीण रुग्णालयात उठसुठ रेफर करण्याचा आजार रुग्णालयास लागला असल्याच्या अनेकांनी तक्रारी दिल्या.
प्राप्त सर्व तक्रारीबाबत मा. आमदार केराम यांच्याशी चर्चा करून १ ते २ आठवड्यात तालुक्यातील सर्व कामे मार्गी काढून यापुढे जनतेची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही सज्ज राहु असे, आश्वासन तक्रारदार यांना स्वीय सहायक प्रकाश कुडमेथे यांनी दिल्याने परिसरात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. सदर कॅम्पसाठी माहुर तालुका भाजपा अध्यक्ष दिनेश एउतकर, निलुभाऊ मस्के, आदिवासी आघाडीचे संजय पेंदोर, नगरसेवक गोपू महामुने उपस्थित होते.
आमदार भीमराव केराम यांच्या माहुर येथील भाजपा कार्यालयात जन तक्रार निवारण कॅम्प सुरु करताच २०० तक्रार प्राप्त
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
