सह्याद्री न्यूज | सुनील शिरपुरे
झरी, (२७ सप्टें.) : तालुक्यात मागील चार-पाच महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठयाचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण नागरिक त्रस्त झाले आहे. बोगस वीज मीटर, रिडींगमध्ये होत असलेली तफावत म्हणजे मागील वर्षीच्या माहेचा सरासरी रिडींग, अवाच्या-सव्वा वीज देयके काढून सुरू करण्यात आलेली लुटमार अशा विविध कारणाने संपूर्ण नागरिक त्रस्त झाले आहे. या कारणांच्या विरोधात आज चक्क महावितरण कार्यालयावर महावितरणची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तिरडी आंदोलन करण्यात आले आहे.
मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात विविध समस्या व मागण्या घेऊन मोठ्या संख्येने नागरिक महावितरण कार्यालय मुकुटबन येथे धडकले. यावेळी अभिनव तिरडी यात्रा काढून जनतेचे लक्ष वेधण्यात आले. यामुळे संपूर्ण मुकुटबन शहर दुमदुमले. या आंदोलनात विविध मागण्या रेटून धरण्यात आल्या. यात प्रामुख्याने झरीजामणी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येणे , अधिकारी मुख्यालयी ठेवण्यात येणे , मुकुटबंन येथे वीज दुरुस्ती केंद्र देणे व बोगस रिडींग घेणाऱ्यावर कार्यवाही करणे या सविस्तर मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या. अशा इतरही मागण्या घेऊन आज मुकुटबन बसस्थानक पासून तर महावितरण कार्यालयापर्यंत तिरडी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोकांनी सहभाग दर्शवून जनतेच्या मागण्या महावितरण अधिकाऱ्यासमोर मांडत निदर्शने केली.
आंदोलनामुळे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांनी समस्त जनतेला ग्वाही दिली की, समस्त जनतेच्या समस्या सोबतच मुकुटबन येथील वितरण केंद्रात वीज बिल दुरुस्ती करीता कर्मचारी ठेवणे, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देणे, तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता वेळोवेळी मेन्टेनन्स ची कामे करणे तालुक्यातील नादुरुस्त मीटर उपलब्धतेनुसार लवकरात लवकर बदलविणे, त्याच प्रमाणे बोगस रिडींग घेऊन चुकीचे बिल पाठविणाऱ्या एजन्सीवर नियमानुसार कठोर कार्यवाही करणे या संदर्भात लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले, तेव्हा आंदोलनाची सांगता करण्यात आली. सोबतच पोलीस विभागाने सुध्दा आंदोलनाला सहकार्य केले .
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे, सौ. लक्ष्मी बच्चेवार, जेस्ट नागरिक गोविंदा उरकुडे, अडेगावच्या सरपंच सीमाताई लालसरे, ग्रा.प.सदस्या सौ. वंदना पेटकर संतोष पारखी, संजय आत्राम, खातेराचे सरपंच विशाल ठाकरे, येडशीचे सरपंच विनोद धोटे , कोसाराचे सरपंच सचिन गोडे, मार्कीचे जीवन उलमले व मित्रपरिवार, पांडरकवडाचे बाळू चेडे, तेजापूरचे शंकर भगत, मांगलीचे विलास कसोटे, मंगेश चामाटे, गणेश पेटकर, राहुल ठाकूर, विजय लालसरे व तालुक्यातील महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झालेले समस्त नागरिक उपस्थित होते.
महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे त्रस्त नागरिकांचा प्रतिकात्मक मोर्चा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
