चंद्रपूर जिल्ह्यात भारत बंदला संमिक्ष प्रतिसाद !


सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२७ सप्टें.) : शेतक-यांना उध्वस्त करणारे तीन कृषी कायदे व कामगार विरोधी कायदे रद्द करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटना व अन्य संघटनांनी आज सोमवार दि.२७ सप्टेंबरला पुकारलेल्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान जिल्ह्यातील मूल, घुग्गुस, नागभिड, ब्रम्हपुरी राजूरा, काेरपना या भागात या बंद ला ब-या पैकी प्रतिसाद मिळाला तर जिल्ह्यातील काही भागात अल्पसा प्रतिसाद मिळाला. दरम्यान या भारत बंद मध्ये अनेक राजकीय पक्षांनी स्वयंस्फुर्तीने सहभागी हाेण्याचे आवाहन काल शनिवार दि. २६ सप्टेंबरला केले  हाेते. आज सकाळी आमच्या प्रतिनिधीने शहरातील बाजार पेठेचा फेरफटका मारला असता जटपूरा गेट, गाेल बाजार, बंगाली कॅम्प, बाबुपेठ, तुकुम येथील अनेक दुकाने नेहमी प्रमाणे सुरु असल्याचे दिसून आले. आजच्या या बंद मध्ये जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष व आम आदमी पार्टी सक्रियतेने सहभागी झाल्याचे एकंदरीत दिसून आले. माेदी सरकारने लादलेले तीन कृषी कायदे रद्द करण्यांत यावे. या प्रमुख मागणी साठी तब्बल १२ महिण्यांपासून दिल्लीच्या सीमेवर लाखाेंच्या संख्येत शेतकरी ठाण मांडुन बसले आहे. या आंदोलन दरम्यान सातशे शेतक-यांचे निधन झाल्याचे काँग्रेसचे मनपा नगरसेवक नंदू नागरकर हे आज आमच्या प्रतिनिधीशी बाेलतांना म्हणाले. केन्द्र सरकारला अजुनही जाग आली नसल्याची खंत त्यांनी आपल्या बाेलण्यातुन या वेळी व्यक्त केली.

आजच्या बंदला अनेकांनी आपला पाठिंबा जाहिर केला हाेता. जिल्ह्यात बंद दरम्यान कुठेही अप्रिय घटना घडली नाही. शहरातील अनेक मुख्य चाैकात पाेलिस बंदोबस्त चाैख ठेवण्यांत आला हाेता. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुसळे यांचे नेत्रूत्खाली स्थानिक गांधी चाैकात आम आदमी पार्टी, सीआयटीयु, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, संभाजी ब्रिगेड व रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिका-यांनी व कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी करीत निदर्शने केली. या वेळी आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
चंद्रपूर जिल्ह्यात भारत बंदला संमिक्ष प्रतिसाद ! चंद्रपूर जिल्ह्यात भारत बंदला संमिक्ष प्रतिसाद ! Reviewed by सह्याद्री चौफेर on September 27, 2021 Rating: 5
Powered by Blogger.