सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०३ सप्टें.) : चंद्रपूर-गडचिराेली या जुळ्या जिल्ह्यातंच नव्हे तरं अख्ख्या महाराष्ट्रात अल्पकालावधीत सहजं सुचलं व्यासपीठ समाजातील महिलां व तरुणींचे हक्काचे व्यासपीठ बनुन ते लोकप्रिय ठरले अशी भावनिक प्रतिक्रिया काल गुरुवारी उपराजधानी नागपूरात सहजं सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका प्रभा अगडे यांनी आपल्या बाेलण्यांतुन व्यक्त केलीे. गेल्या पाच वर्षा पासून हे व्यासपीठ सातत्याने कार्यरत असून नेहमीच महिला व नवाेदित तरुणींच्या कलागुणांना प्रोत्साहित व प्रेरणा देण्यांचे काम सहजं सुचलंने केले आहे. भविष्यात या व्यासपीठावरील उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिलां व तरुणींचा विशेष सन्मान करण्यांचा मानस देखिल प्रभा अगडे यांनी या भेटी दरम्यान बाेलून दाखविला. वर्धा जिल्ह्यातील एका ग्रामीण भागातील अभियांत्रिका असलेलेल्या रितू नावाच्या एका बावीस वर्षीय तरुणींच्या संकल्पनेतुन हे महिला व्यासपीठ आरंभ झाल्याचे ते या वेळी सांगण्यांस विसरल्या नाही. विशेषता सुरुवातीला या व्यासपीठा वरील सदस्यांची संख्या बाेटावर माेजण्या एव्हढी हाेती. आज तीच सदस्या संख्या शेकडाेंच्या घरात आहे. या व्यासपीठावरील दरवर्षी नव्याने संयाेजिका व सहसंयाेजिकांची निवड केल्या जाते हे येथे उल्लेखनीय आहे! विशेषता माझ्या सहवासातील प्रख्यात विदर्भीय जेष्ठ लेखिका ॲड. मेघा धाेटे व नागपूच्या याेगगुरु शिक्षिका मायाताई काेसरे यांची भूमिका सहजं सुचलं साठी फार महत्व पूर्ण राहिली आहे. विद्यमान संयाेजिका व सहसंयाेजिका चंद्रपूरच्या सुविद्या बांबाेडे, सराेज हिवरे (राजूरा), कविता चाफले (दुर्गापूर), प्रतिभा चट्टे (चंद्रपूर तुकुम), मंथना नन्नावरे चंद्रपूर, रसिका ढाेणे वराेरा, श्रुती कांबळे चंद्रपूर यांचे सह इत्तरांचे योगदान माेलाचे राहिले आहे. कला क्षेत्रात साैंदर्य स्पर्धा विजेता कु.कल्याणी सराेदे (कन्हान कांद्री, नागपूर), उज्वला यामावर (गडचिराेली), मनिषा मडावी (गडचिराेली), शितल मेश्राम( गडचिराेली), प्रतीक्षा मैदपवार (वर्धा), क्रीडा क्षेत्रात कु.सायली टाेपकर तरं साहित्य क्षेत्रात जागतिक सुपरिचीत कवयित्रि कु.अर्चना सुतार (पाचवड) तथा प्रतिमा नंदेश्वर (मूल) यांचे कार्य अभिनंदनीय व काैतुकास्पद ठरले असून, चंद्रपूरच्या सहज सुचलंच्या निवेदिका सिमा पाटील यांचे ही याेगदान तेव्हढेच महत्वाचे आहे. शैक्षणिक क्षेत्रा साेबतच आपल्यास कला क्षेत्रातही आवड असल्याच्या प्रभा अगडे मुलाखतीच्या शेवटी म्हणाल्या.
दरम्यान नागपूरच्या जेष्ठ लेखिका गिता बाेरडकर, स्मिता मेहेत्रे, चंद्रपूरच्या चंदा वैरागडे, हैद्राबादच्या विजया तत्वादी , मूलच्या कवयित्रि स्मिता बांडगे, पथ्राेडच्या जेष्ठ लेखिका विजया भांगे, डॉ .अंजली साळवे, डॉ. भारती नेरलवार, नयना झाडे (नागपुर )चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर, छबूताई वैरागडे, अल्काताई माेटघरे, शुभांगी डाेंगरवार, राजू-याच्या संजिवनी धांडे, मुंबईच्या रजनी रणदिवे, श्रुती उरनकर, भाग्यश्री सानप यांचे सहकार्य सहज सुचलंला नेहमीच लाभले आहे.
सहज सुचलं हे महिला व तरुणींचं हक्काचं व्यासपीठ - प्रभा अगडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 03, 2021
Rating:
