टॉप बातम्या

ते वासरू कोट्यात आले कसे? व कोणाचे?

सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (१४ सप्टें.) : महागांव तालुक्यातील वरोडी येथे लहान वासरू महालक्ष्मी पुजन च्या दिवशी अचानक माधवराव आडकीने यांच्या कोट्या मध्ये आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आडकीने यांच्या गोठ्यात सकाळी वरोडी येथील लोकांना ते वासरू दिसले, लोकांनी हनुमान च्या मंदिरातून लाऊडस्पीकरद्वारे सर्व गावाकऱ्यांना सूचित करण्यात आले. परंतु कोणीच त्या वासराचे मालक असल्याचे पुढे सरसावले नाहीत. त्यामुळे याचा मालक कोण आणि कुठला हे कळायला मार्ग नसल्याने आजूबाजूच्या परिसरातसह त्या वासराची वरोडी नवीन टेंभा येथे ही माहिती दिली. परंतु येथीलही लोकांचा होकार मिळाला नसल्याने या लहान वासरामुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे. अखेर ते वासरु कोणाचे असावे, असा कयास नागरिक लावत असून वरोडी जुनी येथे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. अशी माहिती वरोडी येथील सचिन आडकीने यांनी दिली.
Previous Post Next Post