सह्याद्री न्यूज | किरण घाटे🟫
चंद्रपूर, (१४ सप्टें.) : शहरातील बाबुपेठ परिसरातील मुळ वास्तव असणां-या कु. वैष्णीव आंबटकर या १७वर्षिय तरुणीवर स्थानिक महाकाली मंदिरा जवळील रस्त्यावर दि.९सप्टेंबरला प्रफुल आत्रामने रात्री ८ वाजता चाकुने सपासप वार केले. त्यात ती गंभीर जखमी झाली, या घटनेची माहिती हाेताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली हाेती. त्या नंतर चंद्रपूरातील पाेलिस या ठिकाणी दाखल झाले त्यांनी जखमी अवस्थेत या तरुणीला येथील शासकीय रुग्णालयात उपचार्थ दाखल केले. येथील उपचार झाल्या नंतर तिला तातडीने नागपुर येथील शासकीय रुग्णलयात हलविण्यांत आले तिचा प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर मंडळीने शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्यांचे प्रयत्नाला यश आले नाही. अखेर रविवार दि.१२ सप्टेंबरला तीचा मृत्यू झाला. दरम्यान, याच दिवशी सायंकाळी स्थानिक बाबूपेठच्या नागरिकांनी या घटनेचा जाहिर निषेध देखिल नाेंदविला हाेता. साेमवार दि. १३ सप्टेंबरला सदरहु तरुणीचे प्रेत रुग्ण वाहिकेने नागपूर वरुन चंद्रपूरात आणण्यात आले. त्या वेळी बाबूपेठ येथील नेताजी चाैकात नागरिकांनी ठिय्या मांडला हाेता. आराेपीला फाशी झाली पाहिजे, जलद गती न्यायालयात उपराेक्त प्रकरण चालविण्यात यावे अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्त्या चंदा वैरागडे यांनी रेटुन धरली.
सायंकाळ पावेताे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेता या ठिकाणी पाेलिस बंदोबस्त चाेख ठेवण्यात आला हाेता. काही वेळातच सायंकाळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा चंद्रपूरचे लाेकनेते किशाेर जाेरगेवार यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी आपल्या या मागणीकडे जातीने लक्ष देवू असे आश्वासन यावेळी दिले. शहरातील वरिष्ठ पाेलिस अधिका-यांनी देखील या वेळी घटनास्थळी भेट दिली. आश्वासन नंतर अत्यंविधी साठी त्या मृतक तरुणीचे प्रेत तिच्या निवास स्थानाकडे रवाना झाले.
वैष्णवीची अखेर प्राणज्याेत मालवली
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 14, 2021
Rating:
