मारेगावात डेंग्यू आजाराने विवाहित महिलेचा मृत्यू


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 
मारेगाव, (१४ सप्टें.) : मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक १४ मधील एका विवाहित महिलेचा डेंग्यू या आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आयशा आकाश भेले (२५) असे मृतक महिलेचे नाव आहे. आयशा भेले यांचेवर काही दिवसांआधी वणीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता मात्र, प्रकृतीत  सुधारणा न झाल्याने त्यांना नागपूर येथे भरती करण्यात आले होते. आज मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. ही दु:खद बातमी मारेगाव शहरात पसरताच शोककळा पसरली.

शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये वास्तव्यात असलेले
मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक मनोहर भेले व माजी नगरसेवक सुरेखा भेले यांची स्नुषा आहेत. आयशा यांच्या पश्चात पती आकाश भेले, एक मुलगा, सासू सासरे असा आप्त परिवार आहे.

मारेगाव तालुक्यात मलेरिया टायफाईड डेंग्यू या आजाराने थैमान घातले असल्याने प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकातून व्यक्त होत आहे. शहरांसह ग्रामीण भागात डेंग्यू चे मोठया प्रमाणात रुग्ण वाढ होताना दिसत असल्याचे चित्र असतांना प्रशासनाने या गंभीर विषयाकडे ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे.
मारेगावात डेंग्यू आजाराने विवाहित महिलेचा मृत्यू मारेगावात डेंग्यू आजाराने विवाहित महिलेचा मृत्यू   Reviewed by सह्याद्री चौफेर on September 14, 2021 Rating: 5
Powered by Blogger.