प्रहार जनशक्ती पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी दिलीप डवरे यांची नियुक्ती

सह्याद्री न्यूज | रूस्तम शेख
कळंब, (२२ सप्टें.) : गेल्या काही वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बरखास्त करण्यात आलेली होती. अशातच नुकतीच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील विश्रामगृहात झालेल्या बैठकीत प्रहार जनशक्ती पक्ष कळंब तालुका अध्यक्षपदी म्हणून दिलीप महादेव डावरे यांची नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री मा. बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख बल्लूभाऊ जवंजाळ यांनी नियुक्ती केली.

यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नितीन मिर्झापुरे तसेच बिपिन चौधरी, आशिष तुपटकर जी.संघटक, विलास भाऊ पवार, लोकसभा प्रमुख अंकुश वानखडे, सरचिटणीस पिंटू भाऊ दांडगे, प्रमोद कातरकर, सजंय दुरबुडे, स्वप्नील मापारे, गोपाल काकडे, राजु हिरेखन सह जिल्ह्यातील अन्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

दिलीप भाऊ डवरे यांची निवड झाल्या बद्दल राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघांचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी अभिनंदन व्यक्त केले.
दिलीपभाऊ डवरे यांच्या माध्यमातुन जनसामान्यांचे प्रश्न सुटतिल अशी अशी अपेक्षा ग्रामीण भागातील कार्यकर्ते तसेच नागरीकांनी व्यक्त केली.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी दिलीप डवरे यांची नियुक्ती प्रहार जनशक्ती पक्षाच्या कळंब तालुकाध्यक्षपदी दिलीप डवरे यांची नियुक्ती Reviewed by सह्याद्री चौफेर on September 22, 2021 Rating: 5
Powered by Blogger.