सह्याद्री न्यूज | अमोल टेकले
मुदखेड, (२२ सप्टें.) : वीज वितरण कंपनी कडून परिसरातील शेतकऱ्याची व ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेची वीज कनेक्शन कोणतीही पूर्व सूचना न देता कट केले आहे. या मुळे शेतकऱ्यांची व सामान्य जनतेची पाण्या अभावी प्रचंड हाल होत आहे. या यामुळे सदरील ठिकाणचा वीज पुरवठा पूर्ववत करून वीज बील वसूल करावे.
पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांचा व ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजनेचा वीज कनेक्शन जोडून देण्यात यावे. अन्यथा परिसरातील सर्व वीज वितरण कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा या वेळेस देण्यात आला. या वेळेस शिवसेनेचे भोकर विधानसभेचे नेते तथा बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी मा. उपकार्यकारी अभियंता, यांना निवेदन दिले सोबत बाळासाहेब गव्हाणे दिगंबर गव्हाणे गणपतराव शिंदे नागेलीकर उपस्थित होते.
दिनांक २७/९/२०२१ रोज सोमवार सकाळी नांदेड ते भोकर हायवे रोडवर बारड येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे तरी, सर्व मुदखेड तालुक्यातील व बारड परीसरातील सर्व शेतकरी बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान शिवसेनेचे भोकर विधानसभेचे नेते तथा बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख बारडकर यांनी केले तरी सर्वांनी उपस्थित राहावे. असे अहव्हण सर्व शेतकऱ्यांना केले आहे.
महावितरणला बारडकरांचा ईशारा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 22, 2021
Rating:
