निराधार अनुदान योजने अंतर्गत असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा - आ. किशोर जोरगेवारांनी घेतली जिल्हाधिकारी अजय गुल्हानेंची भेट
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (२४सप्टें.) : संजय गांधी निराधार योजनेतील शहरी भागातील तहसीलदार यांचे पद रिक्त असल्यामुळे सदरहु योजनेतील प्रकरणे प्रलंबित आहे. त्यामूळे येथे अधिका-यांची नियुक्ती करण्यात यावी सोबतच एक विशेष मोहिम राबवत प्रलंबित असलेली प्रकरणे जलतगतीने मार्गी काढण्यात यावी अशा आशयाच्या सुचना चंद्रपूरचे विद्यमान आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हानें यांची भेट घेऊन केल्या आहेत. यावेळी सदरहु योजनेच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांना होत असलेल्या अडचणींवरही देखिल चर्चा करण्यात आली .
संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत येणारी प्रकरणे मार्गी काढण्यासाठी शहरी व ग्रामीण भागासाठी दोन तहसीलदारांची नेमणूक करण्यांत आली आहे. मात्र या योजनेतील शहरी भागातील तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. परिणामी संजय गांधी निराधार अनुदान योजने अंतर्गत वृद्ध निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांग, दुर्धर आजाराने ग्रस्त तसेच स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील घटस्फोट झालेल्यांना परंतु पोटगी न मिळालेल्या महिला पीडित व पात्र लाभार्थी शासनाच्या आर्थिक योजनेपासून वंचित आहे. हजारोच्या संख्येने या योजनेतील पात्र लाभार्थी केवळ रिक्त असलेल्या पदामुळे वंचित राहणे योग्य नाही. अनेक लाभार्थ्यांचा घर प्रपंच संसार केवळ या योजनेतून प्राप्त होणाऱ्या अल्प निधीतुन होतो. त्यामुळे या बाबतची गंभीरतेने दखल घेऊन निराधार योजनेअंतर्गत येत असलेल्या विभागातील रिक्त असलेल्या पदांवर अधिकाऱ्यांची तात्काळ नियुक्ती करावी तसेच विशेष पथक तयार करुन मोहिम राबवत सदरहु सर्व निलंबित प्रकरणे मार्गी काढावेत अशा सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी आज शुक्रवारला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना एका चर्चेतुन केल्या आहेत.
निराधार अनुदान योजने अंतर्गत असलेली प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढा - आ. किशोर जोरगेवारांनी घेतली जिल्हाधिकारी अजय गुल्हानेंची भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 24, 2021
Rating:
