सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (२७ सप्टें.) : शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये राहत असलेल्या एका ३० वर्षीय विवाहित महिलेने गळाफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवार दि. २७ सप्टेंबरला ३:३० वा.च्या सुमारास ही घटना उघडीस आली.ज्योती रवींद्र पडलवार (जिड्डेवार) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. ज्योती यांचा मृत्यूदेह गळफास घेऊन लटकलेला आढळून आल्याने याबाबत महिलेच्या वडीलांनी या घटनेची मारेगाव पोलीसांना माहिती दिली असुन, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या चे कारण अस्पष्ट असून महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा आप्ते परिवार आहे.
विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, मारेगावातील घटना
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 27, 2021
Rating:
