"इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा" च्या वतीने शहरात "रेन वॉटर हार्वेस्टिंग" जन जागृती

सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे 
वरोरा, (२४ ऑगस्ट) : "पाण्याची बचत काळाची गरज आहे" हे ध्यानात घेऊन इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा च्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग चा प्रकल्प क्लब च्या कोषाध्यक्ष सौ. सुचेता पद्ममावार यांच्या घरी राबविण्यात आला. श्री. अली प्लंबर, श्री. भाटकर व अन्य जणांनी हा प्रकल्प यशस्वीपणे पार पाडला.
       
"बारिश का पाणी कुदरत का वरदान, चलो वर्षा जल को संरक्षण बनाये अभियान" या ब्रीद वाक्याला समाजात रुजवण्याकरिता, या प्रोजेक्ट ला जिल्हा ३०३ च्या कॉडिनेटर सौ. शितल भराडे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच वरोरा शहरातील पाणी पुरवठा योजनेचे मुख्य अधिकारी श्री. पुनवटकर साहेब यांचे मार्गदर्शनात कार्यक्रम आयोजित केला होता.

या प्रसंगी श्री.पुनवटकर साहेब व सौ. शितल भराडे यांनी आज रेन वॉटर हार्वेस्टिंग का अत्यंत आवश्यक आहे याचे महत्त्व पटवून दिले. तसेच ज्यांना हा प्रकल्प नगरपरिषद व इनरव्हिल क्लब च्या मदतीने राबवायचा आहे त्यांच्या साठी कामगार विनामूल्य हा प्रकल्प उपलब्ध करून देण्यात येतील असे यावेळी आश्वासन देण्यात आले.

सौ. शितल भराडे यांच्या हस्ते या प्रोजेक्ट ला ज्यांनी ज्यांनी मदत केली, त्या सर्वांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यातून प्रेरणा घेऊन उपस्थित सर्व सदस्यांनी आपापल्या घरी हा प्रोजेक्ट राबविण्याचे ठरविले असून, ज्यांना शक्य नाही त्यांनी इतरांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले. समाजात या प्रकल्पाबाबत जन जागृती करण्यासाठी शहरातून रॅली काढण्यात आली. 
           
हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी क्लब च्या सर्वेसर्वा मधु जाजू, सेक्रेटरी वंदना बोढे, सुचेता पद्ममावार, दिपाली माटे, झेनब सिद्दिकोट, प्राजक्ता कोहळे, अनु डोंगरावर, अपेक्षा पांपट्टीवार, किरण जाखोटिया, दिपाली टिपले, विणा पिसे, अर्चना ठाकरे व इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
"इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा" च्या वतीने शहरात "रेन वॉटर हार्वेस्टिंग" जन जागृती "इनरव्हिल क्लब ऑफ वरोरा" च्या वतीने शहरात "रेन वॉटर हार्वेस्टिंग" जन जागृती Reviewed by सह्याद्री चौफेर on August 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.