Top News

शेतकर्‍यांना विश्वासात न घेता मोजनी करता कशी - जगदीश नरवाडे


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव (२४ ऑगस्ट) : तालुक्यातील भुमी अभिलेख कार्यालय अधिक्षक लकडे यांनी सातबारा वरील शेतकर्‍यांची संमती न घेता पोट हिस्से पाडण्याचे काम केल्याने शेतकर्‍यांच्या भावनेला टेच पोहचविली आहे. 
हा अन्याय शेतकरी बांधव कदापी सहन करणार नाही. 

शेतकर्‍यांवर झालेल्या या अन्यायाची सखोल चौकशी करुन दोषी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जगदीश नरवाडे यांनी भुमी अभिलेख कार्यालय महागांव मार्फत जिल्हा अधीषक भुमी अभिलेख यवतमाळ यांना निवेदन देऊन चौकशी करुन दोषी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालय यवतमाळ येथे अन्याय ग्रस्त शेतकर्‍यांना घेऊन मोर्चा काढण्यात येईल असा ईशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे सह शेतकरी बांधव उपस्थित होते.
Previous Post Next Post