बल्लारपूर-विसापूर मार्गावर हिंस्त्र प्राण्यांचा वावर अधिक वाढला


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (२४ ऑगस्ट) : बल्लारपूर तालुक्यातील विसापूर या गावातील असंख्य कामगार बल्लारपूर पेपर मिल मध्ये काम करीत असून, कामगारांना बल्लारपूर ते विसापूर या रस्त्यावरून नित्य कामानिमित्त रात्री-बेरात्री प्रवास करावा लागतो. सदरहु रस्त्यावरील झुडपी जंगलाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असून या परिसरात हिंस्त्र प्राण्यांचा वावर माेठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. हिंस्त्र प्राण्यांमुळे रस्त्यावरील प्रवास करणांऱ्या कामगारांना व प्रवाशांना नेहमीच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. दाेन दिवसांपूर्वी एका कामगाराचा जीव हिंस्त्र प्राण्यापासून सहीसलामत बचावला.

रस्त्यावर झुडपी जंगल वाढल्यामुळे अश्या परिस्थितीत पेपर मिल मध्ये काम करणांऱ्या कामगारांना रात्रीच्या प्रवासात प्रवास करणे कठीण झाले आहे. तरी सदरहु रस्त्याच्या बाजूचे झुडपी जंगलाचा तात्काळ बंदोबस्त करावा व रस्ता मोकळा करावा अश्या आशयाच्या मागणीचे एक निवेदन आज मंगळवारला वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी बल्हारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार यांना सादर केले.

उपराेक्त मागणीची पूर्तता न झाल्यास वंचित बहुजन आघाडी द्वारा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सादर करण्यांत आलेल्या निवेदनातून देण्यांत आला आहे. या मागणीचे निवेदन देतांना वंचितचे नेते राजू झोडे, सचिन पावडे, संपत कोरडे, प्रदीप झामरे, स्वप्निल सोनटक्के, प्रथम दुपारे, भोजेद्रु दुबे, सिद्धांत पुणेकर तथा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बल्लारपूर-विसापूर मार्गावर हिंस्त्र प्राण्यांचा वावर अधिक वाढला बल्लारपूर-विसापूर मार्गावर हिंस्त्र प्राण्यांचा वावर अधिक वाढला Reviewed by सह्याद्री चौफेर on August 24, 2021 Rating: 5
Powered by Blogger.