सह्याद्री न्यूज | कालू रामपुरे
वरोरा, (१६ ऑगस्ट) : स्वातंत्र्यदिनानिमित्त इनव्हील क्लब वरोरा च्या वतीने बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अहिल्याबाई होळकर वृद्धाश्रमात जीवन उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.
समाजातील उपेक्षित घटकांना 'इनरव्हील क्लब' मदतीकरिता नेहमी अग्रेसर असते, नव्यानेच इनरव्हील क्लब अध्यक्ष मधु जाजू सचिव वंदना बोधे व त्यांचे सहकारी सरसावले आहे. त्यांनी अल्पकाळात शेताच्या बांधावर जाऊन शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिलांना रेनकोट चे वाटप केले. त्यानंतर मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देण्याकरता सात दिवसाचं प्रशिक्षण शिबिर माजी सैनिकांच्या मार्गदर्शनात तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आले होते. हे सगळे कार्यक्रम आयोजित करताना अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वृद्धाश्रमात जीवन उपयोगी वस्तूचे वाटप करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले.
यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मधु जाजू, सचिव वंदना बोर्डे, प्राजक्ता कोहळे, मानसी चिकनकर, दिपाली बावणे, सारिका बावणे, कविता बाहेती, हर्षदा कोहळे व इनरव्हील क्लबच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी तसेच सदस्यांनी सहकार्य केले.
'इनरव्हील क्लब'च्या वतीने वृद्धा आश्रमात जीवनावश्यक वस्तूचे वाटप
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 16, 2021
Rating:
